'2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेच...'; रोहित पवारांनी फडणवीसांना डिवचलं

Rohit Pawar| Devendra Fadanvis| गोपीनाथ मुंडे असते तर राज्यातल्या राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती
Rohit Pawar| Devendra Fadanvis|
Rohit Pawar| Devendra Fadanvis|Sarkarnama
Published on: 
Updated on: 

अहमदनगर : 'दिवंगत गोपीनाथ मुंडे हेच 2014 चे खरे मुख्यमंत्री होते. दुर्दैवानं तसं झालं नाही,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या 8 व्या स्मृतीदिनानिमित्त जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत बोते.

‘गोपीनाथ मुंडे हेच 2014 चे खरे मुख्यमंत्री होते. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी तसं झाले. आज गोपीनाथ मुंडे असते तर राज्यातल्या राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती. विरोधक म्हणून विरोधही झाला असता. पण त्याची पातळी एवढी खालीही गेली नसती', अशा शब्दात रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागले.

Rohit Pawar| Devendra Fadanvis|
विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे दिल्ली हायकमांकडे...

विरोध झाला असता तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये वाद झाला असता. पातळी आणि संस्कृती सोडून कोणी बोललं नसतं गोपीनाथ मुंडे आज हयात नसले तरी तुमच्या आमच्या मनात आहेत. त्यांचे विचार घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं, समाजकारण केलं, ज्या पद्धतीने लोकांची काळजी केली, त्या पद्धतीनेच आपणही भविष्यात काम करायचं, असं आवाहन त्यांनी जनतेला दिलं.

तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हेदेखील त्यावेळी उपस्थित होते. "गोपीनाथ मुंडेंच्या वाट्याला जो संघर्ष आला तोच माझ्याही वाट्याला आला.आमच्या कुटुंबाच्या पाचवीलाच हा संघर्ष पुजलेला आहे. या संघर्षाचा काही भाग माझ्या वाट्यालाही आला. कदाचित पंकजा मुंडेंनाही आता वाटत असेल की हा संघर्ष त्यांच्याही वाट्याला आला आहे. मुंडे साहेबांचा संघर्ष व्यक्तिगत नव्हता तर सर्वसामान्यांच्या प्रश्नावर होता, आणि त्याच संघर्षापुढे आम्ही आज नतमस्तक झालो आहोत, असा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories