BJP Political Twist : महापालिकेत सत्तेपासून काहीच अंतर दूर असणाऱ्या चंद्रकांतदादांना 'मॅच टाय'ची भीती? शिंदेंशी चर्चा अन् अजितदादांना हाक

Chandrakant Patil Over Support Of Eknath Shinde Shivsena And NCP : सांगली महानगरपालिकेत अनपेक्षित स्थिती निर्माण झाली असून भाजप सत्तेपासून फक्त दोन जागांनी दूर आहे. पण आता नवी रणनीती आखत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवी घोषणा केली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. सांगली महापालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्याशी थेट चर्चा सुरू केली आहे.

  2. भाजपला ३९ जागा मिळाल्या असून बहुमतासाठी एका जागेची गरज आहे.

  3. शिंदे गटाचे दोन सदस्य मिळाल्यास भाजपकडे स्पष्ट ४१ चे बहुमत होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Sangli Municipal Corporation News : सांगली महानगरपालिकेत अनपेक्षित स्थिती निर्माण झाली असून सत्तास्थापनेसाठी भाजप फक्त दोन जागांनी मागे आहे. यासाठी आता भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील धावाधाव करत असून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी थेट बोलणे सुरू केलं आहे. तसेच महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली तर त्यांचेही स्वागतच असल्याचे वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यामुळे आता सांगलीत भाजपच्या हाकेनंतर शिंदेंसह अजितदादा हाथ देणार का याची उत्सुकता जिल्ह्यात लागली आहे.

सांगली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेच्या जवळपास भाजप पोहचला असून दोन सदस्य मिळाल्यानंतर ते साध्य होणार आहे. सध्या भाजपचे ३९ नगरसेवक निवडून आले आहेत. तर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी एका जागेची गरज आहे. त्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच चंद्रकांत पाटील यांनी आमचे एकनाथ शिंदे यांच्याशी थेट बोलणे सुरू असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांचे दोन सदस्य मिळाल्यानंतर आमचे ४१चे बहुमत होईल. तर महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली तर त्यांचेही स्वागतच आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil: पिंजरा ते नटसम्राट! दोन्ही पाटलांमध्ये जुंपली; जयंतरावांची अवस्था नटसम्राटासारखी...

४० ला महापौर

नुकत्याच पार पडलेल्या सांगलीच्या निवडणुकीत भाजपचे ३९ नगरसेवक निवडून आले आहेत. हे संख्याबळ ५० टक्के असून ४० संख्याबळावर महापौर होतो. यासाठी भाजपकडे फक्त सदस्य संख्या कमी असून बहुमतासाठी दोन सदस्यांना सोबत घ्यावे लागणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं आहे.

मॅच टाय नको

यावेळी त्यांनी, आमच्याकडे निम्मे सदस्य आहेत. महापौरपदावेळी मॅच टाय होईल. मग, टॉस टाकावा लागेल. ती रिस्क घ्यायला नको, अशी आमची भूमिका आहे. शिवाय काठावरचं बहुमत हे विकासाला योग्य नाही. आम्ही काठावरच्या गणितात राज्य चालवण्यात माहीर आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माहीर राजकारणी आमच्याकडे आहे; पण विकासाला ते सोयीचं नसतं. त्यामुळे आम्ही प्रयत्न करू. समोरून प्रस्ताव आले तर सगळे आलबेल होईल. आम्ही विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू.

महापौरपदाचे आरक्षण २० किंवा २३ तारखेला निघेल. त्यानंतर १५ दिवसांची मुदत असते. त्यामुळे लगेच घाई करणार नाही. त्यातच जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ आहे. त्यामुळे कोल्हापूर, पुणे आणि आज सांगली पूर्ण केले आहे. आमच्यात स्पष्टता आहे. महायुतीतल्या घटक पक्षांशी बोलणी सुरू आहेत. शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदेंशी बोलणी सुरू आहेत. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. त्यांचे दोन सदस्य मिळाले असल्याने ४१ संख्याबळ झाले आहे.

महायुतीतील दुसरा घटक पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी तो बाहेर राहतो. त्यामुळे त्यांनाही घेण्याच्या विषयाबाबत सकारात्मक आहोत. स्थानिक राष्ट्रवादीमधून निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्याबाबत ठरवावे लागेल. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांनी निर्णय घ्यायचा आहे. ते बरोबर आले तर त्यांचे स्वागत आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil : 'पाईपलाईनचे पैसे थेट बावड्याच्या घरात...', चंद्रकांत पाटलांनी वादाला तोंड फोडलं

FAQs :

1) सांगली महापालिकेत भाजपला किती जागा मिळाल्या आहेत?
भाजपला सांगली महापालिकेत ३९ जागा मिळाल्या आहेत.

2) बहुमतासाठी भाजपला किती जागांची गरज आहे?
सत्तास्थापनेसाठी भाजपला एका जागेची आवश्यकता आहे.

3) भाजप कोणाशी चर्चा करत आहे?
भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी चर्चा करत आहे.

4) शिंदे गटाचा प्रतिसाद काय आहे?
एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

5) राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय भूमिका आहे?
महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली तर त्यांचे स्वागतच असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com