Pune News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत त्यांच्याच पक्षातील नेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली. यापूर्वी अनेकदा संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या विशेष मुलाखती आपण पाहिलेल्या आहेत.
मात्र पहिल्यांदाच ठाकरे गटातील एका महिला नेत्याकडून संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली आहे. त्यामुळे या मुलाखतीकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येत आहे. या मुलाखतीत सुषमा अंधारे यांनी विविध मुद्द्यांना हात घालत संजय राऊत यांना सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत बोलतं केलं.
या मुलाखतीमध्ये संजय राऊत(Sanjay Raut) यांना तुम्ही एवढं सगळं बोलता भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला गेला, त्यावर राऊत म्हणाले, 'मी शिवसेना नेता आणि सामनाचा संपादक असलो तरी गेली अनेक वर्ष मला शरद पवारांचा माणूस आहे, काँग्रेसचा माणूस आहे तर त्यापूर्वी कॉम्रेड डांगे यांचा माणूस आसल्याचं बोललं जात होतं.
मात्र मी शिवसेनेचाच होतो आणि आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझ्या उमेदीतील सगळे आयुष्य काढलं. त्यामुळे ज्या माणसाने बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर इतकी वर्षे काढली असेल तो घाबरेल कसा?.' असा प्रती सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यानंतर सुषमा अंधारे यांनी संजय राऊत हे राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे जवळचे मित्र, शरद पवारांचे निकटवर्तीय आणि त्यांचा राहुल गांधी यांच्याशी चांगला स्नेह आहे. हा समतोल कसं साधतात? असा प्रश्न केला. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, 'एमआयएमचे खासदार ओवैसी देखील माझे मित्र आहेत. ओवैसी यांनी मांडलेल्या अनेक मुद्द्यांमध्ये लॉजिक असतं ते बॅरिस्टर आहेत. त्यांनी कायदा शिकलेला आहे. त्यांनी या देशाचे संविधान वाचून काही मुद्दे मांडले ते मला पटत नसतील मात्र म्हणून मी त्यांना देशाचा शत्रू ठरवणार नाही.'
याशिवाय 'आपण देशामध्ये संविधान मानतो तर आपले जे राजकीय विरोधक आहेत त्यांच्याशी उत्तम संवाद असणे आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनी मला आपल्या टीकाकारांसोबत चांगला संवाद ठेवण्याची शिकवण दिली. बाळासाहेब ठाकरे हे रोज सकाळी त्यांच्यावरती टीका करण्यात आलेले लेख सर्व प्रथम वाचत असत आणि त्यानंतर ते संबंधित पत्रकाराला फोन करून चर्चेचं निमंत्रण देत.' अशी आठवणही यावेळी संजय राऊतांनी सांगितली.
वंचित बहुजन आघाडीबाबत आपलं मत व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले 'प्रकाश आंबेडकर एक मोठे नेते आहेत. 2019 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडी उभारून मोठ्या प्रमाणात मतं घेतली होती. त्यामुळे देशामध्ये असलेल्या सध्याच्या हुकूमशाही सरकारचा पराभव करण्यासाठी त्यांना सोबत घेणे आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकर यांची शिवसेनेशी यापूर्वीच युती झाली आहे. मात्र ते महाविकास आघाडीमध्ये नव्हते, त्यांचा सहभाग लवकरच होईल.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.