Hasan Mushrif News :अनिल देशमुख यांनी एवढे खोटे बोलू नये...

Hasan Mushrif on Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्यावर हसन मुश्रीफ बरसले   
Anil Deshmukh, Prafull Patel and Hasan Mushrif
Anil Deshmukh, Prafull Patel and Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : सध्या अजित पवार गट आणि शरद पवार गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच अजित पवार गटाचे कर्जत येथे चिंतन शिबिर पार पाडलं. या चिंतन शिबिरातून अजित पवार यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी हा दावा फेटाळला आहे. आता या वादात कोल्हापूरचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी उडी घेत अजित पवार यांनी जे सांगितले ते वस्तुस्थितीला धरून असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी इतकं खोटं बोलू नये, अशी टीकादेखील केली आहे. 

कर्जत येथील चिंतन शिबिरात अजित पवार गटातील सर्वचं प्रमुख नेत्यांनी शरद पवार गटावर शरसंधान साधलं. त्यामुळे या दोन्ही गटांतील संघर्ष आणखी चिघळा आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने सामने आले असताना अनिल देशमुखांनी अजित पवारावर गंभीर आरोप करीत वादाला तोंड फोडले आहे. त्यात रोज नवीनवीन नेते उडी घेताना दिसत आहेत. यात हसन मुश्रीफ यांनीदेखील उडी घेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anil Deshmukh, Prafull Patel and Hasan Mushrif
Ahmednagar Politics : विखे-तनपुरे-कर्डिले गट पुन्हा आमने सामने... 

लोकसभा निवडणूक उमेदवारीवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, "  जिथे आमचे खासदार आहेत. त्या जागा आम्हीच लढवणार आहोत. त्यात बारामतीसुद्धा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. 

एक नवीन पक्ष काढा. नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करून दाखवा, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवार यांना दिले आहे . त्याला  उत्तर देताना मुश्रीफ म्हणले, ज्या पक्षात इतकी वर्षे काम केलं तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार? जो पक्ष कष्ट करून वाढवला त्याबद्दल वेगळ्या भावना असतात. 

Anil Deshmukh, Prafull Patel and Hasan Mushrif
ED Officer Bribe Case : ईडीच्या अधिकाऱ्याने मागितली तब्बल 3 कोटींची लाच; पुढे काय घडलं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com