Kolhapur Political News : काय सांगता ! कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक मुश्रीफ आणि घाटगेंमध्ये 'दिलजमाई'

Hasan Mushrif & Samarjeet Ghatge : गेल्या सात महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अगदी टोकाला गेला होता.
Hasan Mushrif & Samarjeet Ghatge
Hasan Mushrif & Samarjeet GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : कागलच्या राजकारणातील दोन कट्टर विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्याकडे पाहिले जाते. सलग पाचवेळा निवडून येत हसन मुश्रीफ यांनी निवडून येत त्यांनी कागलवर आपले वर्चस्व ठेवला आहे. २०१९ ला मोदी लाटेतही कागलमधून मुश्रीफांनी घाटगेंना पराभवाचा धक्का दिला होता.

याचवेळी मुश्रीफांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावण्यात घाटगेंचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आता अजित पवार हे शिंदे - फडणवीस सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मुश्रीफ आणि घाटगे एकत्र आलेले पाहायला मिळाले.

Hasan Mushrif & Samarjeet Ghatge
Amit Shah News : घराणेशाहीवर टीका करणाऱ्या अमित शहांना मंत्री स्टॅलिनचा सवाल; 'तुमच्या मुलाने क्रिकेटमध्ये किती धावा..'

कोल्हापूर(Kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार गटाचे नेते- वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक, भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांच्यासह कागल तालुक्यातील प्रमुख सर्वच नेत्यांनी मतभेद बाजूला सारून एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या सर्व नेत्यांनी एकमुखाने इचलकरंजी शहराला पाणी देण्यास कडाडून विरोध दर्शवत या योजनेच्या कामाला स्थगिती देण्याची सूचनाही प्रशासनाला केली. इचलकरंजीकरांनी पाण्यासाठी आपल्याकडे येऊच नये अशी भूमिका मुश्रीफ यांनी घेतली आहे.

Hasan Mushrif & Samarjeet Ghatge
Pravin Darekar slams Uddhav Thackeray : सत्ता गेल्याने उद्धव ठाकरेंच्या पोटात मळमळ सुरू.. ; दरेकरांनी डिवचलं

इचलकरंजी आणि कागलमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुळकूड पाणी योजनेला मान्यता देण्यात आल्यानंतर वादाची ठिणगी पडली आहे. इचलकरंजीला दुधगंगा नदीतून पाणी देण्यास कागलमधील सर्वच नेत्यांनी मतभेद बाजूला एकमुखाने तीव्र विरोध दर्शवला आहे. मात्र, इतरवेळी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या राजकारण्यांची पाण्यासाठी झालेल्या दिलजमाईची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर काही काळ हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) आणि समरजितसिंह घाटगे एकमेकांच्याजवळ येत काहीक्षण विनोदात रमल्याचे दिसून आले. गेल्या सात महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमधील संघर्ष अगदी टोकाला गेला होता. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर करण्यात आलेल्या आरोप- प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापले होते.

सुळकूड पाणी योजनेवरुन उभय नेत्यांनी राजकीय आणि पक्षीय मतभेद विसरुन एक व्हावे लागले. दोघांची कुस्ती कागल मतदारसंघासाठी असल्याने आणि हा मुद्दाही मतदारसंघाशी निगडीत असल्याने दोघांनाही एकाच व्यासपीठावर यावे लागले. राज्यातील नव्या राजकीय समीकरणांमुळे मुश्रीफ आणि घाटगे या दोन तलवारी एकाच म्यानात कशा राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Hasan Mushrif & Samarjeet Ghatge
Sambhaji Bhide Controversy : "संभाजी भिडे पंतप्रधान मोदींचे समर्थक, म्हणूनच फडणवीसांकडून कारवाई नाही" ; कुणी केला खळबळजनक आरोप?

राज्यात २०१९ ला मोदी लाट असताना देखील विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे (Samarjeet Ghatge) यांचा पराभव केला. तर याच पराभवाचा वचपा २०२४ ला काढण्यासाठी घाटगे यांनी मतदार संघ पिंजून काढण्यास सुरूवात केली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माझाच विजय असणार, असे जाहीर करत मतदार संघातील एकाही सभा, मेळाव्यातून मुश्रीफांवर बोलण्याची संधी सोडली नाही. तर मुश्रीफांनी विकासकामे व त्यांची उद्घाटने घेत आरोप-प्रत्यारोप करत घाटगेंवर टीकेची तोफ डागली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com