Sambhaji Bhide Controversy : "संभाजी भिडे पंतप्रधान मोदींचे समर्थक, म्हणूनच फडणवीसांकडून कारवाई नाही" ; कुणी केला खळबळजनक आरोप?

Sambhaji Bhide Controversy : भिडेंनी याबाबत तात्काळ दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.
Sambhaji Bhide Controversy :
Sambhaji Bhide Controversy :Sarkarnama

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आता राज्यभरात विरोधी पक्षाचे नेते रस्त्यावर उतरू लागले आहेत. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. भिडेंना त्वरीत अटक करण्याची मागणी होत आहे. अधिक तीव्रपणे आंदोलने करू, असा इशारा विरोधकांनी दिला. यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Sambhaji Bhide Controversy :
Chhagan Bhujbal On Bhide : ''...म्हणून भिडे वाट्टेल ते, रोज-रोज नवीन काहीतरी बोलतात !''; भुजबळांनी टोचले कान

विनायक राऊत यांनी संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतानाच गृहमंत्री यांच्यावर गंभार आरोप केले आहेत. राऊत म्हणाले, "संभाजी भिडे ज्या पद्धतीने बोलले आहेत त्याचा निषेध केला पाहिजे. कोणत्याही महापुरूषाचा अपमान करणे योग्य नाही. भिडेंनी याबाबत तात्काळ दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. भिडे गुरूजी हे नरेंद्र मोदींचे समर्थन करतात, म्हणूनच फडणवीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असाही खळबळजनक आरोप राऊत यांनी केला.

मंत्री केसरकरांवरही टीका -

"दीपक केसरकर हा बोलका पोपट आहे. त्यांच्या बेताल विधानांना मी फार महत्त्व देत नाही. फक्त मंत्रीपदाच्या लालसेमुळे त्यांनी उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्याशी बेईमानी केली. उपकारकर्त्याचेच उपकार अपकारांनी कसं फेडावं, याचं उदाहरण केसरकर आहेत" अशी जहरी टीका विनायक राऊतांनी केली.

Sambhaji Bhide Controversy :
Sanjay Raut News : पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाह, फडणवीस अन् शिंदे यांची एकच इच्छा; राऊत स्पष्टच बोलले

राऊत पुढे म्हणाले, "सावंतवाडीत यावेळी निवडणुकीला केसरकरांनी उभ राहून दाखवावं, त्यांचं डिपॉझिटच जप्त करून टाकू." विनायक राऊत (Vinayak Raut) हे नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधतना त्यांनी केसकरांवर टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com