Solapur Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीत सग्या-सोयऱ्यांचाच भरणा...पंढरपुरात पवारांचे निष्ठावंत दूर!

Pandharpur Politics : काळे यांचे वर्चस्व पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पदाधिकारी निवडीत स्पष्टपणे दिसून येते.
Solapur NCP
Solapur NCP Sarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. या कार्यकारिणीमध्ये सगे-सोयरे आणि जवळच्या कार्यकर्त्यांचा भरणा असल्याचे दिसून येते. विशेषतः पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना आणि सगे सोयऱ्यांनाच संधी दिल्याची चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे. पवारांचे निष्ठावंत पक्षाच्या पदापासून दूर राहिल्याचे सांगितले जात आहे. (Opportunity for leaders in favor of Kalyan Kale in election of NCP office bearers)

अजित पवार यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे त्यांच्या पाठीशी राहिले. मध्यंतरी महायुतीचे सरकार आल्यानंतर काळे यांच्या कारखान्याला राज्य सरकारने आर्थिक मदत दिली होती. त्यामुळे काळे यांनी अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Solapur NCP
NCP Hearing : राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? 15 फेब्रुवारीपर्यंत लागणार निकाल; नार्वेकरांची माहिती

अलीकडेच कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांची राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेली काही महिन्यांपासून काळे बंधूंची अजितदादांशी जवळीक वाढली आहे. त्याचा परिणाम सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी निवडीतही दिसून आला. त्यातून पंढरपूर तालुक्यातील अजित पवार गटाचे आपण नेते असल्याची संधी काळे यांनी बरोबर साधली आहे.

काळे यांचे वर्चस्व पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पदाधिकारी निवडीत स्पष्टपणे दिसून येते. स्वतः कल्याणराव काळे हे प्रदेश कार्यकारणीवर सदस्य म्हणून गेले आहेत. तसेच, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष अशा महत्वाच्या पदावर काळे यांचे सगे सोयरे आणि मर्जीतील कार्यकर्त्यांना संधी मिळाल्याचे दिसून येते. त्यापैकी एक म्हणजे पंढरपूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आलेले कौठाळी अनिल नागटिळक. ते काळे यांचे नातेवाईक आणि कट्टर समर्थक मानले जातात.

Solapur NCP
Lalit Patil Drugs Case : आमदार धंगेकरांचा मुश्रीफांवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

खेड भाळवणी येथील आर. डी. पवार आणि भंडीशेगाव येथील नवनाथ माने यांची यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी नारायण शिंदे (देवडे), अर्जून जाधव (पळशी) यांना संधी देण्यात आली आहे. यातील जाधव आणि पवार हेही काळे यांचे नातेवाईक आहेत.

Solapur NCP
Solapur NCP : वडील पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष; तर मुलगा अजितदादांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष!

वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील यांची तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे काळे यांच्याकडून जवळच्याच कार्यकर्त्यांना आणि सगे सोयऱ्यांनाच संघटनेतील महत्वाच्या पदावर संधी देण्यात आलेली आहे. यामध्ये पवारांशी वर्षानुवर्षे निष्ठा ठेवून असणारे मात्र पदाधिकारी निवडीत कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सगेसोयरे आणि मर्जीतील लोकांचाच भरणा असल्याचे दिसून येते.

Solapur NCP
Ajit Pawar Kolhapur Tour : ‘मी, मुख्यमंत्री अन्‌ फडणवीस एकत्र बसून भुजबळांशी बोलणार’; भुजबळ तिघांचा सल्ला ऐकणार का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com