Ajit Pawar : 'झेंडा महायुतीचा... पण महापौर राष्ट्रवादीचाच...' अजित पवार यांच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

NCP Politics : आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जोरदार तयारी सुरू होती. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Sangli Mahayuti Politics
Sangli Mahayuti Politicssarkarnama
Published on
Updated on

Sangli News : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी सुरू असून भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. तिन्ही पक्षाकडून फायदेशीर ठरणाऱ्या नेत्यांना आपल्याकडे खेचले जात आहे. अशातच सांगलीतील काँग्रेसच्या बंडखोर नेत्या श्रीमती जयश्री पाटील यांना आपल्याकडे घेण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी केली होती. पण भाजपने डाव साधला आणि जयश्री पाटील यांच्या हातात घड्याळा ऐवजी कमळ आले. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्थानिकसाठी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार असा दावा केला असतानाच त्यांच्याच पक्षाचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी मात्र महापौर राष्ट्रवादीचाच असेल असे म्हटल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सांगलीत स्वबळाच्या तयारीत असणाऱ्या भाजपसाठी आयते कारण मिळण्याची शक्यता आहे. (Internal conflict in Ajit Pawar's NCP as Hasan Mushrif and Idris Nayakvadi make contradictory claims on Sangli mayor post)

यावेळी आमदार इद्रीस नायकवडी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे, तालुकाध्यक्ष देवजी साळुंखे, विष्णू माने, जमिल बागवान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी राज्यातील महायुतीचे सरकार काम करत आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेवून त्यांच्या विकासासाठीच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीबाबत चांगले वातावरण आहे. तर काहीच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. त्यातही महायुतीच वरचढ ठरणार असून सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेवरही महायुतीचाच झेंडा फडकणार असा दावा केला आहे. यावेळी शिवसेना (शिंदे) शहर प्रमुख विजय शिंदे, शिवसेना (ठाकरे) शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांच्यासह इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

Sangli Mahayuti Politics
NCP SP Politics : पेशवाई नको म्हणत... शरद पवारांच्या पक्षाने सुचवली पुणे स्थानकासाठी पाच नावं

महायुतीच्या सरकारमुळे सर्वसामान्यांचे प्रश्‍न सुटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस ही सुरुवातीपासूनच पुरोगामी विचारांचा पुरस्कार करते. हाच विचार आणि वारसा यापुढेही कायम राखत पक्षाची वाटचाल सुरु आहे. येत्या चार महिन्यात महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका होणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणूकांची तयारी सुरु करावी. तर ज्याठिकाणी युती होईल तिथे युती करून, तिन्ही पक्ष एकत्र येवून निवडणूक लढतील आणि जिथे शक्य नाही अशाठिकाणी वेगळे लढू मात्र, महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल. निवडणूकीत मते मिळावीत म्हणून जनतेला कोणतेही आमिष दाखवू नका तर त्यांच्या ह्रदयात शिरा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा जनता तुम्हालाच मत देईल, असा कानमंत्रही त्यांनी यावेळी दिला.

तसेच एका वॉर्डात चार उमेदवार असणार आहेत. एकजरी कमजोर उमेदवार असलातरी इतर तीन उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे इच्छूकांची संख्या कितीही असलीतरी सर्व्हे करून मगच उमेदवारांची निवड करा, अशाही सूचना हसन मुश्रीफ यांनी यावेळी नेत्यांना दिल्या आहेत.

एकीकडे मंत्री मुश्रीफ महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल असे सांगत असतानाच मात्र दुसरीकडे इद्रिस नायकवडी हे महापौर हा ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चाच होईल असे सांगत आहेत. तसेच त्यांनी महायुतीतील मित्र पक्षांना महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी आमच्या पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते असल्याचे सांगत एकाप्रकारे स्वबळाचा नाराच दिला आहे. तसे संकेततच ते देत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Sangli Mahayuti Politics
NCP Ajit Pawar Politics: भाजप, शिवसेनेत प्रवेश सोहळे, अजित पवारांची महापालिका निवणुकीसाठी खास रणनीती!

नायकवडी यांनी महायुती असो किंवा नसो पुढील महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचाच असेल असे ठणकावून सांगितले आहे. तसेच त्यांनी आगामी महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढायची की स्वतंत्रपणे लढायची याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतला जाईलं. याबाबत अद्याप कोणतेही आदेश नाहीत. पण महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी आमच्या पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते आहेत. आम्ही महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीही सज्ज असल्याचेही त्यांनी सांगत योग्य वेळी त्या नावांची घोषणा केली जाईल असेही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com