Hasan Mushrif : बंटी पाटलांनी भरस्टेजवर मुश्रीफांची कळ काढली, वैद्यकीय मंत्र्यांनी थेट सांगितले...

Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापूर दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या वतीने आज (ता.10) जिल्ह्यातील महायुतीचे खासदार आणि सरकारमधील मंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
Hasan Mushrif And Satej Patil
Hasan Mushrif And Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Gokul News : कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने आज (ता.10) जिल्ह्यातील महायुतीचे खासदार आणि महायुती सरकारमधील मंत्र्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांची चांगलेच फटकेबाजी झाली.

भाषणाच्या सुरुवातीला बोलताना सतेज पाटील यांनी लाडक्या बहिणीवरून मंत्री मुश्रीफ यांना डिवचले. त्यावर उत्तर देताना मुश्रीफ यांनी या स्टेजवर मी राजकीय बोलणार नव्हतो पण बंटी पाटलांनी माझी कळ काढली असे म्हणत राजकीय फटकेबाजीला सुरूवात केली. यावरून सध्या जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे.

यावेळी मुश्रीफ यांनी, गोकुळच्या कार्यक्रमात मला राजकारणावर बोलायचं नव्हते, पण बंटी पाटलांनी चिमटा काढला. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. माय-भगिणींना पैसे मिळाल्याने बाजारात गर्दी झाली, नवऱ्याकडे पैसे मागायचं बंद झालं. त्याचा फटका कसा बसला हे बंटी पाटलांना माहिती आहे. विकासकामाला आम्ही शक्यतो कात्री लावू पण लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. असा छाती ठोकपणे दावा मुश्रीफ यांनी यावेळी केला.

Hasan Mushrif And Satej Patil
Hasan Mushrif announcement : हसन मुश्रीफांना भलताच कॉन्फिडन्स; कोल्हापुरचे पालकमंत्री म्हणून स्वतःच केली घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार, म्हणजे पुन्हा आम्हाला सर्व सत्ता लाडक्या बहिणी देतील, असाही दावा मुश्रीफ यांनी केला. दरम्यान भाषणाच्या सुरुवातीला मुश्रीफ यांनी, सतेज पाटील यांच्या राजकीय भविष्यवाणीवर भाष्य केले. त्यांनी काही दिवसांनी सतेज पाटील यांच्या हातात काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा येईल, असे म्हटले.

नेमके काय म्हणाले सतेज पाटील?

अध्यक्षीय भाषणात बोलताना सतेज पाटील यांनी, 2100 रूपये कधी द्यायचं तेंव्हा द्या. पण बहिणींना कमी करू नका, असं म्हणत भाषणाच्या सुरवातीला मुश्रीफांचा चिमटा काढला. तसेच कागलचा बॅकलॉग भरला असून आता शहरात वैद्यकीय कॉलेज सुरू करा, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

Hasan Mushrif And Satej Patil
Satej Patil Video : 'चीत भी मेरी, पट भी मेरी', संतोष देशमुख हत्येवरून सतेज पाटील सत्ताधाऱ्यांवर बरसले

आम्ही दोघेचं काँग्रेसचे आमदार

पाटील यांनी, आयुर्वेद, योगा कॉलेज कागलमध्ये झालं, आता डेंटल कॉलेज शहरात काढणार, असं जाहीर करा. आम्ही दोघेचं काँग्रेसचे आमदार आहोत, आमचं पत्र आले की विचार करावा, असा खोचक टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com