
Santosh Deshmukh Murder Case : राज्यात बीड प्रकरणावरून सत्ताधार्यांमध्ये चांगलीच राजकीय आग धुमसत आहे. विरोधकांकडून देखील सत्ताधाऱ्यांवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. अशातच आज काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. बीड प्रकरणावरून बोलताना, राज्यावर एखादा प्रसंग आला की अर्धे मंत्रिमंडळ एका बाजूला आणि अर्धे मंत्रिमंडळ एका बाजूला असते.
गेल्या अडीच वर्षापासून आपण हे पाहतोय, हे आता पण सुरू आहे का? त्यामुळे बीडच्या प्रकरणात 'चीत मी मेरा, पट भी मेरा', अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी कोल्हापुरात बोलत होते.
न्याय मागणारे पण त्यांचेच आहेत. अन्याय काय होतंय हे सांगणारे पण त्यांचेच लोक आहेत. महायुती मधले हे दोन पक्ष आहेत, हे सत्तेत एकत्र आहेत का दोन वेगवेगळे पक्ष आहेत याचा विचार पडतोय. बीड हत्या प्रकरणाचा सरकार खेळखंडोबा करतेय. सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) हे सातत्याने वेगळी भूमिका मांडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेत आहेत. राष्ट्रवादीची याबाबत भूमिका काय आहे हे स्पष्ट होत नाही.
अजून काही मारेकरी सापडलेले नाहीत, वास्तवता समोर आलेली नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का अशी महाराष्ट्राला शंका, असल्याचे सतेज पाटील (Satej Patil) यांनी सवाल उपस्थित केले आहेत. बीड हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करू शकत नाही. हे महाराष्ट्रातील पोलिसांचं दुर्दैव. राजकीय दबाव बाजूला ठेवून पोलिसांनी कारवाई करावी. जी एसआयटी नेमली ते त्यांच्याच संबंधित आहेत, हे समोर आलं. या सर्व प्रकरणाची पारदर्शकता असावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
पालकमंत्री निवडीवरून बोलताना सतेज पाटील म्हणाले, पालकमंत्री हे झेंडावंदनासाठी नसतात, अनेक कामे रखडली आहेत. असे सांगत चीन मधील नवा व्हायरसचा रुग्ण बेंगळुरू येथे अढळल्यानंतर सतेज पाटील यांनी भूमिका मांडली. अशा संसर्ग वेळी राज्यातील समन्वयक महत्त्वाचा ठरतो. सीमा भागात राज्य सरकारकडून विशेष काळजी घेतली जावी. नव्या व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारी घ्यावी, असेही पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.