Hasan Mushrif announcement : हसन मुश्रीफांना भलताच कॉन्फिडन्स; कोल्हापुरचे पालकमंत्री म्हणून स्वतःच केली घोषणा

Kolhapur Guardian Minister : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे आमदार असल्याने पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

KolhaPur News : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर होऊन मंत्र्यांनी शपथविधी घेतला. आता महायुतीतील सर्वच पक्षांचे लक्ष जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर लागले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे आमदार असल्याने पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता लागली आहे. महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पालकमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेच्या अधिक जागा असल्याने या पालकमंत्री पदावर शिवसेनेचा हक्क सांगितला जातोय. तर भाजपच्या सूत्रानुसार ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल, असेही सांगितले जाते. 26 जानेवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री समजेल, अशी प्रतिक्रिया यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिली. मात्र, आज झालेल्या एका कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतःचेच नाव घोषित केले आहे.

Hasan Mushrif
Santosh Deshmukh Case संभाजीराजे यांनी कुणावर साधला निशाणा

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जायला पाहिजे’ असे वक्तव्य करून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 21 दिवस झाले तरी अजूनही पालकमंत्रीपदाची नावे जाहीर झालेली नाहीत.

Hasan Mushrif
Santosh Deshmukh Murder Case : समाज आधीच अस्वस्थ; त्यात खासदारांबद्दल पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या टिपण्णीची भर...

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील आणि नवे मंत्री प्रकाश आबिटकर यांची नावे चर्चेत आहेत.  परंतू, महायुतीच्या नव्या धोरणानुसार जिल्ह्यातील सक्षम असलेल्या वरिष्ठ मंत्र्याकडे दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन यांच्या गळ्यात ही पालकमंत्री पदाची माळ पडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर जिल्ह्यावरील दावा सोडतील, याची शक्यता कमीच आहे.

Hasan Mushrif
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्येप्रकरणी 'SIT'ला मोठं यश; आरोपींचा प्लॅन फसला, 'ते' व्हिडीओ पुन्हा मिळवले

एकीकडे पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या चर्चेमुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी भाषणाला उभारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याचे सांगितले. त्यांच्या स्वागतासाठी जाण्याच्या गडबडीत मुश्रीफ होते. बोलता बोलता त्यांनी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी जाण्याची गडबड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जायचे आहे. असे बोलून गेले. अनावधानाने केलेल्या मुश्रीफ यांच्या वक्तव्याने अनेकांना धक्का बसला. तर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने मुश्रीफ यांनी शब्द बदलले. पण तोपर्यंत राजकीय तर्क लढवले गेले.

Hasan Mushrif
Beed Santosh Deshmukh Case : जरांगेना बेड्या ठोका, धसांचा राजीनामा घ्या; ओबीसी नेते आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com