Hasan Mushrif: 10 टक्क्यांच्या आरोपांवरून हसन मुश्रीफांचं राजीनामा अस्त्र : ठेकेदारांना दिलं आव्हान

Hasan Mushrif, Contractor Allegations, Commission Row: ठेकेदारांनी आमदार आणि मंत्र्यांवर कमिशन घेतल्याचा आरोप केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आरोप फेटाळले. पुरावे सादर केल्यास राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur: "सर्व आमदारांना दहा टक्के कमिशन दिले जाते, हे विधान ठेकेदारांनी मागे घ्यावे. हे चुकीचे वक्तव्य आहे. मी कोणत्याही कामात, बदली, पदोन्नतीत कमिशन, पैसे घेतलेले नाहीत. तसे असेल, तर दाखवा मी राजीनामा देतो", असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. रविवारी (१४ जून) कोल्हापुर मधील ठेकेदारांनी बैठक घेऊन आमदार, मंत्री यांच्यावर टीका केली होती. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे.

प्रशासकांनी केवळ दैनंदिन कामे करावी. म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. जे निर्णय आहेत ते येणारे संचालक मंडळ घेईल, अशी त्यांनी भूमिका ठेवावी. जिल्हा बॅंकेचे ११२ कोटी, यासह बॅंका, साखर कारखान्यांबाबतच्या चर्चेसाठी केंद्रीय सहकारमंंत्री अमित शहा यांनी इचलकरंजीमध्ये दहा मिनिटे दिल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Hasan Mushrif
Pune Airport : पुणे विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा! गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाच्या टॉयलेटमध्ये एअर होस्टेसला 'ती' चिट्टी सापडली अन् एकच गोंधळ

हवामान खाते दुष्काळी परिस्थिती सांगते, त्यावेळी पंजाबराव डख पाऊस पडणार म्हणून सांगतात. तसे झाल्यास त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू. दुष्काळाची परिस्थितीसाठी आता आई अंबाबाईनेच लक्ष घालावे, अशी प्रार्थना करूया, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापुरमध्ये आयोजित महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात राज्यभरातील ठेकेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जिल्हा परिषद आणि इतर विभागांतील कामांबाबत ठेकेदारांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बोलताना ठेकेदारांनी शासकीय ठेक्यांच्या प्रक्रियेवर टीका केली होती.

Hasan Mushrif
Maharashtra News Live Update : 'ते नेहमी बैठका ठेवत असतात, पण...' : आमदार निलेश राणे

अंदाजित रकमेपेक्षा १५ ते २० टक्के कमी दराने निविदा भरावी लागत असल्याने सुरुवातीलाच तोटा सहन करावा लागतो, असे ते म्हणाले. तसेच आमदार, अधिकारी- कर्मचारी आणि विविध करांच्या स्वरूपात एकूण ५६ टक्के रक्कम खर्च होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात ठेकेदारांचा नफा धरला तर ६४ टक्के रक्कम खर्च होते. त्यामुळे उर्वरित रकमेत दर्जेदार काम कसे होणार, असा सवाल ठेकेदारांनी उपस्थित केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com