Mushrif vs Ghatage : कागलचा सामना मैदानाबाहेरही रंगणार, घाटगे अन् मुश्रीफांनी थोपटले दंड

Hasan Mushrif vs Samarjit singh Ghatage : कागल विधानसभा मतदारसंघातील दोन नेते वेगवेगळ्या दिवशी विजय संकल्प मेळावा घेणार आहेत. यासाठी पक्षाचे प्रमुख नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
Hasan Mushrif _ Samarjit singh Ghatage
Hasan Mushrif _ Samarjit singh GhatageSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची ठरलेली कागल विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. हा प्रचार केवळ कागल मतदारसंघापुरताच मर्यादित राहिला नाही तर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या तोफा आता जिल्ह्याबाहेर धडाडणार आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून कामासाठी आणि वास्तव्यासाठी जिल्ह्याबाहेर गेलेल्या मतदारांसाठी घाटगे (Samarjit Singh Ghatage) आणि मुश्रीफ यांनी मुंबई-पुणे जिल्ह्यात मेळाव्याचे आयोजन केले आहे. पुण्यात वास्तव्यास असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातील मतदारांसाठी हे दोन नेते वेगवेगळ्या दिवशी विजय संकल्प मेळावा घेणार आहेत. यासाठी पक्षाचे प्रमुख नेते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघातील (Kagal Vidhansabha Election) मतदारांचा नाव, गाव पत्ता शोधून त्यांना कोणताही त्रास न होता थेट पुण्यात जाऊन मेळावा घेणार आहेत. त्यासाठी विशिष्ट यंत्रणा कामाला लागली आहे. रविवारी 29 सप्टेंबर रोजी पुण्यातील भोसरी येथील संत तुकाराम बँक्वेट हॉल, भोसरी उडान पुलाच्या खाली या ठिकाणी या कागलवासियांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पालकमंत्री मुश्रीफ यांच्या टीमने सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मतदारांना त्यांच्या घरापासून आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

Hasan Mushrif _ Samarjit singh Ghatage
Chandrakant Patil : समरजीत आपलेच, त्यांच्यावर काही बोलायचं नाही! चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना टाकलं बुचकळ्यात

तर शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार समरजीत घाटगे यांचा देखील मेळावा उद्या रविवारी 22 सप्टेंबर रोजी पुण्यातील चिंचवड मधील चिंचवडे लॉन्स येथे होणार आहे. खासदार सुप्रियाताई सुळे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. गेल्या महिनाभरापासून दोन्ही गटाची यंत्रणा ही पुणे आणि मुंबई येथील मतदारांना संपर्क साधण्याचे काम करत होती. पुढील आठवड्यात मुंबई येथे घाटगे गटाचा मेळावा होणार आहे. दरम्यान कागल विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असले तरी त्याची धग मुंबई पुण्यापर्यंत यानिमित्ताने पोहचणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com