Mushrif-Ghatge Came Together : राजकीय वैर विसरून घाटगे-मुश्रीफ मंडलिकांसाठी आले एकत्र; बंद खोलीत अर्धा तास चर्चा...

Kolhapur Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी या तिघांचीही बंद खोलीत चर्चा झाली आहे. जवळपास अर्धा तास त्यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती कशी असावी, याबाबत चर्चा झाली.
Samarjitshinh Ghatge-Sanjay Mandlik-Hasan Mushrif
Samarjitshinh Ghatge-Sanjay Mandlik-Hasan MushrifSarkarnama

Kolhapur, 30 March : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कागलच्या राजकीय विद्यापीठातील दोन कट्टर मल्ल एकत्र आले आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यात खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी समेट घडून आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर कागल (Kagal) विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी या तिघांचीही बंद खोलीत चर्चा झाली आहे. जवळपास अर्धा तास त्यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती कशी असावी, याबाबत चर्चा झाली. सध्या कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पारडे जड आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेचे उमेदवार खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना मताधिक्य देण्यासाठी व्यूवरचना आखण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Samarjitshinh Ghatge-Sanjay Mandlik-Hasan Mushrif
Udayanraje Bhosale News : भाजप तुमच्याशी फसवाफसवीचं राजकारण करतंय का? उदयनराजेंचे मिश्किल उत्तर...

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कागलला राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजित घाटगे यांचे विळा भोपळ्याचे नाते आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये दोघेही एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहतात. हे अनेकांनी मागील विधानसभा निवडणुकीत पाहिले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी हे दोघेही मल्ल महायुतीत एकत्र आले आहेत. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या विजयासाठी पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांनी खासदार मंडलिक यांच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकत्र उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर कागल, चंदगड, राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील प्रमुख नेत्यांचा मेळावा कोल्हापुरातील महाराजा लॉन्स येथे पार पडला. या मेळाव्यानंतर खासदार मंडलिक यांच्यासोबत समरजित घाटगे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बंद खोलीत चर्चा केली. घाटगे आणि मुश्रीफ एकत्र आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

Samarjitshinh Ghatge-Sanjay Mandlik-Hasan Mushrif
Girish Mahajan Akluj Tour : भाजपचे संकटमोचक पुन्हा अकलूजमध्ये येणार; मोहिते पाटलांची नाराजी दूर करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com