कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर आगामी लोकसभा निवडणूक आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर भाष्य केले. यापूर्वी मुश्रीफ यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागा शिवसेनेकडे (शिंदे) राहतील असा दावा केला होता. आज त्यांनी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर भाष्य केले. त्याचवेळी त्यांना शाहू महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याचीही शहरात चर्चा सुरू आहे.
महायुतीतील जागावाटपाबाबत बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, जागा वाटपाबाबत तीनही पक्षांचे लोक ठरवतील त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते त्याची अंमलबजावणी करू. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले त्याचवेळी त्यांच्या जागा त्यांना देण्याचा ठरलं होते. जे काय व्हायचं ते दोघांच्या संमतीने होईल, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
आता महाविकास आघाडीतून (MVA) श्रीमंत शाहू महाराज यांच्या उमेदवारीचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरून मुश्रीफ यांना विचारलेल्या प्रश्नावर, श्रीमंत शाहू महाराजांनी लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) उभं राहू नये, असं आम्हा सर्वांना वाटत आहे. ते आमच्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांनी राजकारणात यावं किंवा न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही लोकशाही आहे. श्रीमंत शाहू महाराज एक आदर्श स्थान असल्यामुळे ते स्थान तसंच राहावं असं वाटत आहे. लोकशाहीमध्ये लोकांनी ठरवायचं असतं की कुणाला निवडून द्यायचं, असं मुश्रीफ म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून येण्यासाठी मला जीवाचं रान करावं लागेल. हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करावं लागेल. आणि दोन्ही जागा निवडून आणायला लागतील. तसा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.