Hasan Mushrif : सभासदांना 'या' निवडणुकीत तीर्थक्षेत्र दर्शन, मंत्री मुश्रीफांचे हॉटेल्स पॉलिटिक्सचे सुतोवाच; सगळंच सांगत म्हणाले, 'पश्चाताप...'

Hasan Mushrif Hints At Hotel Politics In Gokul Election : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करत ठराव दाखल केले जात आहेत. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ वर महायुतीचा झेंडा फडकवायचा मानस बोलून दाखवला आहे.
Gokul Election; Hasan Mushrif
Gokul Election; Hasan Mushrifsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Gokul Election News : ठराव दाखल झाल्यानंतर आपल्याला तीर्थक्षेत्राला दर्शनासाठी जायचं आहे. त्यावेळी 'पेरणी आहे, म्हैशी आटलीय, माझ्या शिवाय धार देत नाही', अशी कोणतीही कारण देऊ नका. निवडणूक ही निवडणूक असते निवडणुकीत ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टी केल्या नाही तर त्याचा फार मोठा पश्चाताप होऊ शकतो, असे विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहेत. तसेच यावेळी गोकुळ निवडणुकीत देखील हॉटेल पॉलिटिक्स करण्याचे संकेत मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहेत. आज राष्ट्रावादी काँग्रेसने गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तीप्रदर्शन करत ठराव दाखल केले आहेत. त्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते.

आज 1971 ठराव आपल्याकडे आहेत. म्हणजेच जवळपास 2000 ठराव आपल्याकडे आहेत. 2 हजार ठराव दाखल करायचे आहेत. महायुतीमधील मोठा भाऊ म्हणून आपणच (राष्ट्रवादी) राहणार आहोत. तर गोकुळवर महायुतीचाच झेंडा फडकवायचा आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

गोकुळ दूध संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज ठराव दाखल करत आहोत. हे शक्ती प्रदर्शन नाही. सुमारे 2000 च्या आसपास ठराव आमच्याकडे आहेत. प्रत्येक पक्ष वेगवेगळे ठराव दाखल करणार आहे. जागा वाढवून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असेल, असे मुश्रीफ म्हणाले.

Gokul Election; Hasan Mushrif
Hasan Mushrif: 10 टक्क्यांच्या आरोपांवरून हसन मुश्रीफांचं राजीनामा अस्त्र : ठेकेदारांना दिलं आव्हान

दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या बॅनरबाजीवर बोलताना मुश्रीफ म्हणाले, गेल्या वेळच्या सत्तेत आम्ही आणि आमदार सतेज पाटील एकत्र होतो. मात्र आता राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य एकत्र आहोत. या पाच वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेचे विश्वास आबाजी, राष्ट्रवादीचे अरुण डोंगळे आणि नवीद मुश्रीफ अध्यक्ष होते.

या काळात आम्ही गाई आणि म्हशीच्या दुधाला चांगला दर दिला. तर मुंबई पुण्यातील विस्तार वाढ, करमाळ्याचा सौरऊर्जा प्रकल्प, डीबेंचर रकमा ठेवून ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतले असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. तसेच तुकाराम मुंडे यांच्याबाबत बोलताना, तुकाराम मुंडे यांची अजिबात बदली होणार नाही. त्यांच्या मनात आहे, तोपर्यंत ते पदावर राहतील, असे मुश्रीफ म्हणाले.

1971 ठराव दाखल केल्याचा दावा :

करवीर : 223

राधानगरी : 384

कागल : 284

भुदरगड : 213

चंदगड : 165

Gokul Election; Hasan Mushrif
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी गेम फिरवला; 'गोकुळ'चा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या हाती

1971 ठराव दाखल केल्याचा दावा :

गडहिंग्लज : 222

शिरोळ : 65

शाहूवाडी : 152

पन्हाळा : 50

हातकणंगले : 67

गगनबावडा : 2

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com