Sanjay Pawar News : जवाब द्या, नाहीतर राजीनामा द्या; ठाकरे गटाकडून पालकमंत्री मुश्रीफांवर सरबत्ती

Ncp Politics News : विविध विकास काम अपूर्ण असताना केवळ विकासाच्या गप्पा ठोकणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 100 कोटी रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा यांच्या अपूर्ण कामांबद्दल जवाब द्या, अशी थेट मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केली.
 Hasan Mushrif, Sanjay Pawar
Hasan Mushrif, Sanjay Pawar, Sarkaranma
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांवरून आणि समस्यांवरून मंगळवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाच्यां नेत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. विविध विकास काम अपूर्ण असताना केवळ विकासाच्या गप्पा ठोकणाऱ्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 100 कोटी रस्ते, आरोग्य, पाणीपुरवठा यांच्या अपूर्ण कामांबद्दल जवाब द्या, अन्यथा राजीनामा द्या. अशी थेट मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

या संदर्भात उत्तर न मिळाल्यास सहा जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा इशाराही शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी दिला आहे. (Sanjay Pawar News)

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना, नेहमीप्रमाणेच कोल्हापूरला प्रत्येक निर्णयाची प्रयोगशाळा समजून कोल्हापूरवर निव्वळ निधीच्या घोषणांची खैरातींची सवय लावली आहे. प्रत्यक्षात एकही काम न करता सर्वच नेते अकार्यक्षम राहिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या कोल्हापुरातील अकार्यक्षम पालकमंत्र्यांच्या यादीमध्ये मुश्रीफ यांचा देखील समावेश करावा का? असा प्रश्न संजय पवार यांनी केला आहे.

100 कोटी रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. टक्केवारीसाठी काम रखडले काय? असा रोखठोक सवाल करत महापालिकेच्या प्रशासनाला धारेवर धरत मोठ्या गाजावाजाने शुभारंभ तुम्ही कोल्हापूरच्या शंभर कोटी रुपयांची रस्ते योजनेचा केला. पण आज अखेर पावसाळ्याानंतर करण्यात येईल, असे जुजबी उत्तर शहरअभियंत्यांनी दिले.

 Hasan Mushrif, Sanjay Pawar
Ambadas Danve News : मोठी बातमी : अंबादास दानवेंचे पाच दिवसांसाठी निलंबन

खरंतर आज 16 रस्त्यांवर खर्च होणार हा निधी अमृत योजना गॅस पाईपलाईन व इतर गोष्टीमुळे उखडलेले रस्ते निव्वळ या कंत्राटदाराच्या व महापालिका प्रशासनाच्या कारभारामुळे हा संपूर्ण पावसाळा जनता या खड्ड्याातून प्रवास करणार याचे आपल्याला सोयरसुतक नाही का? याला जबाबदार कोण याचे उत्तर पालकमंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी द्यावे, असा सवाल ही संजय पवार यांनी केला.

सहा जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली तर या बैठकीत घुसण्याचा इशाराही संजय पवार यांनी दिला आहे.

 Hasan Mushrif, Sanjay Pawar
Video Prasad Lad : "मी आईच्या आठवणीनं रात्रभर रडलो," दानवेंच्या शिवीगाळानंतर लाड यांचं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com