Hasan Mushrif : मुश्रीफांचा राजीनामा तयार, पण नेत्यांच्या आग्रहाखातर निर्णय बदलला!

Minister Hassan Mushrif Announces Resignation from Bank Presidency : जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडणार असल्याचे खुद्द अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले होते. मात्र, आगामी वर्षात जिल्हा बँकेची निवडणूक आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात महत्वाचे :

  1. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संचालकांच्या आग्रहामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेतला.

  2. बँकेच्या मासिक बैठकीत सर्व संचालकांनी एकमुखीपणे मुश्रीफ यांना अध्यक्षपद न सोडण्याची विनंती केली, त्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा रद्द करण्यात आली.

  3. कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक आगामी वर्षी होणार असल्याने त्यानंतर मुश्रीफ अध्यक्ष राहतील की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाची पदे आणि सहकारी संस्थांवरील अध्यक्षपदाचे केंद्रस्थान आपल्याच घरात असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं सुतोवाच केलं होतं. मात्र या प्रकरणावर आता पडदा पडला आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे राजीनाम्याच्या तयारीत असताना संचालकांनी तो देण्यापूर्वीच फेटाळला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या मासिक बैठकीत संचालकांनी राजीनामा देऊ नये, अशी आग्रही भूमिका घेतल्यावर राजीनामा देणार नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडणार असल्याचे खुद्द अध्यक्ष मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले होते. मात्र, आगामी वर्षात जिल्हा बँकेची निवडणूक आहे. त्यामुळे राजीनामा देऊ नये, अशी एकमुखी मागणी आज संचालकांनी बैठकीत केली. यानंतर अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर पडदा पडला.

Hasan Mushrif
Congress Politics : थरूर यांच्यानंतर काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याचं बंड? अधिवेशन सुरू असतानाच दिले मोठे संकेत...

दरम्यान, येत्या वर्षात कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. त्या अनुषंगाने पुढील काळात मंत्री हसन मुश्रीफ हे अध्यक्ष राहतील का नाही याची शक्यता कमीच आहे. संचालकाने घेतलेल्या निर्णयानंतर मंत्री मुश्रीफ यांचा हा निर्णय बदलला.

मंत्री मुश्रीफ यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेत पुढील अध्यक्ष कोण होणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. या चर्चांना देखील आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र पुढील वर्षी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीनंतर मात्र मंत्री मुश्रीफ हे जिल्हा बँकेतील अध्यक्ष पद स्वीकारणार का याकडे देखील आता संचालकांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.be

Hasan Mushrif
Manikrao Kokate News : अजितदादांकडून कृषीमंत्र्यांची 'शाळा' : झाप झाप झापलं... कोकाटे शांतपणे फक्त ऐकत होते!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  1. प्रश्न: हसन मुश्रीफ कोणत्या बँकेचे अध्यक्ष आहेत?
    उत्तर: कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे.

  2. प्रश्न: त्यांनी राजीनामा का देण्याचा निर्णय घेतला होता?
    उत्तर: अनेक पदे एकाच घरात असल्याने त्यांनी राजीनाम्याचे सुतोवाच केले होते.

  3. प्रश्न: राजीनामा त्यांनी का मागे घेतला?
    उत्तर: संचालकांच्या एकमुखी आग्रहामुळे.

  4. प्रश्न: जिल्हा बँकेची पुढील निवडणूक कधी होणार आहे?
    उत्तर: आगामी वर्षात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com