NCP : कोरेगाव- खटावमध्ये वाद पेटवण्यासाठी त्यांचे घाणेरडे राजकारण : शशिकांत शिंदे

Shashikant Shinde पुसेगाव, खटाव येथे झालेल्या आंदोलानामध्ये केल्या गेलेल्या आरोपांना आमदार शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
MLA Mahesh Shinde, Shashikant Shinde
MLA Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र वाघ

Koregaon News : 'मी आमदार आणि जलसंपदा मंत्री झाल्यावर जिहे-कटापूर योजनेसाठी सर्वाधिक २८९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच नेर तलावामध्ये पाणी पडू शकले, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी या योजनेसाठी काहीच केले नाही, हा आरोप धादांत खोटा आहे. कोरेगाव आणि खटावमध्ये वाद पेटवण्यासाठी खटाव तालुक्यातील सामान्य लोकांना आंदोलनाच्या माध्यमातून पुढे करण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे', अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी आमदार महेश शिंदेंवर Mahesh Shinde निशाणा साधत आंदोलनात झालेले आरोप फेटाळून लावले.

मी आमदार आणि जलसंपदा मंत्री झाल्यावर जिहे-कटापूर योजनेसाठी सर्वाधिक २८९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच नेर तलावामध्ये पाणी पडू शकले, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर नेर तलावाच्या वरच्या परिसरातील काळेवाडी, पांढरवाडी, रणसिंगवाडी, डिस्कळ, गांधीनगर, रामोशीवस्ती, जळकेमळा, अनपटवाडी, चिंचणी, मोळ तसेच कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी, शेल्टी, खिरखिंडी, भंडारमाची, चिमणगाव, भाटमवाडी, वाघजाईवाडी, जायगाव, एकंबे या गावांचा समावेश लाभक्षेत्रामध्ये करण्यासाठीचा ठराव नियामक मंडळाच्या बैठकीत केला.

त्यामुळे मी या योजनेसाठी काहीच केले नाही, हा आरोप धादांत खोटा आहे. रामोशीवाडी (ता. कोरेगाव) व परिसरातील गावांना जिहे-कटापूर योजनेतून पिण्याचे पाणी देण्याला विरोध करण्यासाठी पुसेगाव, खटाव येथे झालेल्या आंदोलनामागचा बोलविता धनी एकाच वेळी आंदोलनकर्त्यांची आणि कोरेगाव तालुक्यातील गावांची दुहेरी फसवणूक करत आहे.

MLA Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde : आमदार महेश शिंदेंना CM शिंदे, DCM फडणवीसांकडून वाढदिवसाची भेट

तसेच कोरेगाव आणि खटावमध्ये वाद पेटवण्यासाठी खटाव तालुक्यातील सामान्य लोकांना आंदोलनाच्या माध्यमातून पुढे करण्याचे घाणेरडे राजकारण या योजनेचे नाव बदलण्याशिवाय काहीही न करणाऱ्यांकडून सुरू आहे', अशा शब्दांत आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळून आंदोलनामध्ये झालेले आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी फेटाळले आहेत.

MLA Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara BJP News: महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री भाजपचाच होणार... जयकुमार गोरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com