Prashant Paricharak : भालके समर्थकांची परिचारक वाड्यावर हजेरी; प्रशांत परिचारकांना दिल्या शुभेच्छा...!

Bhagirath Bhalke Group : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Prashant Paricharak-Bhalke supporter
Prashant Paricharak-Bhalke supporterSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 August : पंढरपूर-मंगळेवढा मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढविण्यासाठी पांडुरंग परिवार प्रचंड आग्रही आहे. दरम्यान, मंगळेवढ्यातील भालके समर्थकांनी आज परिचारक वाड्यावर हजेरी लावत प्रशांत परिचारक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून (Pandharpur-Mangalvedha Constituency) आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. परिचारक समर्थक विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत प्रचंड आग्रही असताना खुद्द प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी मात्र त्याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. पण, समर्थकांचा रेटा त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा आज वाढदिवस होता. एरव्ही वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय मंडळी बाहेरगावी जातात. पण, आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशांत परिचारक हे आज दुपारपर्यंत वाड्यावर थांबून शुभेच्छा स्वीकारत होते. पंढरपूरसह जिल्ह्यातील समर्थकांनी शुभेच्छा देण्यासाठी परिचारक वाड्यावर हजेरी लावली होती.

मंगळवेढ्यातील भालके समर्थकांनीही पंढरपूरध्ये जाऊन प्रशांत परिचारक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील, श्री संत दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील, गुलाब थोरबोले, दयानंद सोनगे, भारत बेदरे यांचा समावेश आहे. दरम्यान, परिचारकांना शुभेच्छा द्यायला भालके समर्थ परिचारक वाड्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Prashant Paricharak-Bhalke supporter
Ramesh kadam : मोहोळमध्ये तुतारीचा उमेदवार कोण?; पवारांनंतर रमेश कदमांनी घेतली राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची भेट

दरम्यान, श्री संत दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आमदार समाधान आवताडे यांचा पराभव करण्यासाठी समविचारी आघाडीच्या माध्यमातून शिवानंद पाटील यांनी भालके गटाला सोबत घेतले होते. कारखान्याच्या निवडणुकीत झालेली युती भालके यांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. कारण, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी परिचारक वाड्यावर लावलेली हजेरी अनेक चर्चांना निमंत्रण देणारी ठरली आहे.

पंढरपूर पोटनिवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपला दावा मागे घेत समाधान आवताडे यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. आवताडे यांना निवडून आणण्यात परिचारक समर्थकांचा मोठा वाटा आहे. पोटनिवडणुकीत निसटते का होईना पण परिचारकांनी पंढरपूर तालुक्यातून आवताडेंना मताधिक्य दिले होते.

Prashant Paricharak-Bhalke supporter
Rohit Pawar : कर्जत-जामखेड सोडून मी कोठेही जाणार नाही; रोहित पवारांनी दिले स्पष्टीकरण

आता पंढरपूरमधून प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा दबाव परिचारक यांच्यावर वाढत आहे. याशिवाय मागील पोटनिवडणुकीत आम्ही दावा सोडला होता. मात्र, आगामी निवडणूक लढविण्याचे संकेत मागील काही मेळाव्यातून परिचारक यांनी दिले होते. त्यामुळे परिचारक पंढरपूरमधून अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com