Udayanraje Bhosale : एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळी जाण्यासाठी निमंत्रण लागत नाही. मंदिरात या आणि पाया पडा, असे कोणी सांगत नाही. त्यामुळे मी तेथे जाणार की नाही, यापेक्षा मी अंत:करणातून तेथे आहे, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरून व्यक्त केले.
यावेळी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले, हिंदुत्व हा धर्म नाही, हा जीवनाचा मार्ग आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी त्या काळातसुद्धा सर्वधर्मसमभाव संकल्पना रुजवली आणि ती आचरणात आणली. त्यांनीदेखील इतर कोणत्याही धर्माचा भेदभाव केला नाही. मात्र आज जाती - जातीत कारण नसताना भेदभाव केले जात आहेत, हे चांगले नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पण, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बारकाईने पाहिले तर छत्रपतींचे विचार खऱ्या अर्थाने कोणी आचरणात आणले असतील तर ते मोदीजींनी. त्यांनी विविध टीम निर्माण करून ते आचरणात आणले आहेत. येत्या 22 तारखेला राम मंदिर उद्घाटनाचा मोठा सोहळा पार पडत आहे. आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतंय, हे आपले भाग्य म्हटले पाहिजे. अनेक वाद-विवाद होत असतात.
कारण नसताना काही जण केंद्रित झालेले लोक आहेत, ते स्वार्थापोटी काही जण विधाने करतात. त्यातून समाजात तेढ निर्माण होते. माझी कळकळीची विनंती आहे. या राममंदिरांच्या माध्यमातून आचरण करावे, त्यांचे चांगले होईल. त्या दिवशी आपल्या सर्वांचे कर्तव्य म्हणून आपापल्या घरी प्रभू श्रीरामांचे पूजन करावे. आपण आपली भारतीय संस्कृती जपली नाही तर तुमची आमची ओळख राहणार नाही.
अनेक देशांत फिरलो. विविध देश बघितले. पण आपल्या देशाच्या संस्कृतीबाबत परदेशातील लोक येथे पीएचडी करण्यासाठी येत आहेत. विविध आश्रमांचा जो गाभा आहे, ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे. परदेशातील लोक ती मान्य करीत असतील तर तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे.
तुम्हाला निमंत्रण दिले आहे का, या प्रश्नावर वर उदयनराजे म्हणाले, मंदिरात किंवा धार्मिक स्थळी जाण्यासाठी निमंत्रण लागते का, असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, हा प्रश्न विचारताना आपण स्वत: एखाद्या आरशापुढे उभे राहून स्वत: ला विचारा. या आणि पाया पडा असे होत नाही. मी जाणार की नाही जाणार, यापेक्षा मी अंत:करणातून तेथे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
R...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.