Mann Khatav Politic's : अनिल देसाईंचा अजितदादांसमोरच गौप्यस्फोट; ‘खटावमधील एका व्यक्तीचा फोन आला; म्हणून पोलिसांनी मला नोटीस काढली होती’

Anil Desai Join NCP : पवार कुटुंबावर प्रेम करणारी अनेक माणसं या मतदारसंघात आहेत आणि उद्याही असणार आहेत. तुमचा आणि बारामतीचा उल्लेख केल्याशिवाय माण खटावची एकही सभा होत नाही. पण, त्या उचक्या प्रेमाच्या नव्हत्या.
Anil Desai
Anil DesaiSarkarnama
Published on
Updated on

Satara, 25 August : ‘आम्ही कोणाला शिवीसुद्धा दिलेली नाही; पण रातोरात मला पोलिसांची नोटीस आली. मी पोलिस ठाण्यात गेलो तर ‘तुम्हाला एक फोन आलेला आहे म्हणून नोटीस काढण्यात आली आहे’ असे पोलिसांनी सांगितले. खटाव तालुक्यातील एका व्यक्तीकडून 24 फेब्रुवारी म्हणजे माझ्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी मला फोन आला होता. त्या एका फोनमुळे मला पोलिसांची नोटीस आली होती,’ असा खळबळजनक गौप्यस्फोट सातारा जिल्ह्यातील माण खटावचे नेते अनिल देसाई यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई (Anil Desai) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या कार्यक्रमात बोलताना देसाई यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. काही कालखंडापूर्वी हा माण खटावसुद्धा तुमचा बालेकिल्ला होता. पवार कुटुंबावर प्रेम करणारी अनेक माणसं या मतदारसंघात आहेत आणि उद्याही असणार आहेत. तुमचा आणि बारामतीचा उल्लेख केल्याशिवाय माण खटावची एकही सभा होत नाही. पण, त्या उचक्या प्रेमाच्या नव्हत्या.

यापुढे तुम्हाला उचकी लागली तर माण खटावची हजारो लोकं तुमची आठवण काढणारी असेल. ते सांगतात की, अजितदादा (Ajit Pawar) आता पुण्यातून आमच्याकडे वळून बघा. लक्ष्मणतात्या पाटील यांना खासदार करण्यासाठी सर्वाधिक मतं देणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे लक्ष्मणतात्यांच्या पाठीमागे मकरंदआबा आणि नितीनकाकांना माण-खटावच्या लोकांसाठी मायेची थाप ठेवावी लागणार आहे, असेही देसाई यांनी नमूद केले.

अनिल देसाई म्हणाले, आम्ही कोणाला साधी शिवीसुद्धा दिलेला नाही, तरीही रातोरात आम्हाला पोलिस प्रशासनाची नोटीस आली. पोलिसांनी तीन दिवसांनंतर ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. मी तीन दिवसांनंतर पोलिस ठाण्यात गेलो, तर पोलिसांनी सांगितलं ‘तुम्ही टॉप कॉलर आहे,’ असे सांगितले. मला काही समजले नाही म्हणून मी आणखी चौकशी केली. तेव्हा तुम्हाला एक फोन आलेला आहे, म्हणून तुम्हाला नोटीस काढली आहे, असे पोलिसांनी मला सांगितले.

Anil Desai
Ajit Pawar : ‘लाडकी बहिणी’चा लाभ घेणाऱ्या पुरुषांना अजितदादांनी आपल्या स्टाईलने सुनावले; ‘त्यांना पुरुष म्हणावं की आणखी काही?’

मी पोलिसांना विचारलं, कोणाचा फोन मला आला आहे आणि किती तारखेला आला आहे. खटाव तालुक्यातील एका व्यक्तीचा 24 फेब्रुवारी रोजी मला फोन आला होता. तो माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी आला होता. त्या फोनमुळे पोलिसांनी मला नोटिस पाठवून माझी चौकशी केली होती, असेही देसाई यांनी नमूद केले.

Anil Desai
Yugendra Pawar : युगेंद्र पवारांचा मोठा निर्णय; ‘इथून पुढे अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढविणार नाही’

ते म्हणाले, माझी विनंती आहे. माझं चुकत असेल तर दहिवडीच्या बाजार पटांगणात मला फाशी द्या. त्या वेळी पोलिस अधिकारी मला म्हणाले, ‘ज्यांचं नाव यादीत येतं, त्यांना आम्हाला नोटीस काढावी लागते.’ कार्यकर्ता चुकत असेल तर त्याला फाशी द्या. पण, राष्ट्रवादीसाठी काम करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे, ही जबाबदारी पक्षाचे प्रमुख म्हणून अजितदादा आपली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com