Praveen Tarde : ‘नसरापूर घटनेसारख्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी सिनेमा काढेन, ते पाहून कोणाचेही धाडस होणार नाही’

Nasrapur incidents : नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येनंतर प्रवीण तरडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अशा गुन्ह्यांविरोधात सिनेमा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
Praveen Tarde
Praveen TardeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 May : नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा हत्या करण्यात आली. त्या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. त्या घटनेबाबत चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना ‘अशा नराधमांना धडा शिकविण्यासाठी सिनेमा काढेन आणि ते पाहून कोणी असं कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही,’ असे जाहीर केले आहे.

अक्कलकोट (Akkalkot) येथील स्वामी समर्थ मंदिरात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी ही भावना व्यक्त केली आहे.

प्रवीण तरडे म्हणाले, नसरापूर (Nasrapur) घटनेतील नराधमांना धडा शिकविण्यासाठी आगामी काळात सिनेमा काढणार आहे. मी एक फिल्म मेकर आहे, त्याबद्दल मी माझी उदविग्न प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यावरूनही मोठा गदारोळ उठला होता.

मी पण शेवटी माणूस आहे. महाराष्ट्रातील पोरींच्या बापांना विचारा, ती बातमी पहिल्यानंतर काय झाले असेल...? आगामी काळात मी देऊळ बंद या सिनेमाचे 11 भाग करणार आहे. त्यामुळे ‘देऊळ बंद’च्या पुढील एखाद्या भागात अशा नराधमांना ठेचायला स्वतः स्वामींनाच यावे लागले, असेही सूतोवाच तरडे यांनी केले.

Praveen Tarde
Krishna Sugar Election : कृष्णा कारखान्याची निवडणूक पावसाळ्यानंतर? : इच्छुकांच्या उत्साहावर पडणार पाणी!

प्रवीण तरडे म्हणाले, त्या माझ्या सिनेमात कायदाबियदा असं काही नसेल. कारण ज्यावेळी स्वामी समर्थच शिक्षा द्यायला उतरतात तेव्हा स्वामींची शिक्षा ही भयानक असते. स्वामींनी तो प्रकार पहिला असेल, त्यामुळे त्या नराधमांना असा मृत्यू येईल की, पुन्हा कोणी असे कृत करण्यास धजावणार नाही.

जे सध्या चाललंय, ते अतिशय भयाण आहे, त्यामुळे यानिमित्ताने पोरींच्या आई-बापांना आशेचा किरण देण्यासाठी असा चित्रपट बनवेन की, त्या चित्रपटात अशा नराधमांना असे मृत्यू दिसतील, ते पाहून कोणी असं कृत्य करण्याची हिम्मत करणार नाही, असेही तरडे यांनी स्पष्ट केले.

Praveen Tarde
Governor Rajendra Arlekar : तमिळनाडूत 'DMK-AIADMK'ची सत्ता? राज्यपालांनी सर्व चर्चांवर थेट उत्तर देत वाढविली धाकधूक...

तरडे म्हणाले,ज्या पद्धतीने 'मुळशी पॅटर्न'नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाकधापाटशाहीने घेणं बंद झालं. कारण, ‘मुळशी पॅटर्न’ने शेतकऱ्यांना खडबडून जागं केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com