Ichalkaranji politics : इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिनसलं; ठाकरेंच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा

Ichalkaranji Mahavikas Aghadi Rift : लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडी म्हणून लढलेल्या इचलकरंजीमधील महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 पक्षांमध्ये बिनसले आहे. काल ठाकरेंच्या शिवसेनेने मेळावा घेत आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास, इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार, अशी घोषणा केली आहे.
Shiv Sena UBT Ichalkaranji
Shiv Sena district chief Vaibhav Ugale addressing party workers in Ichalkaranji, announcing that the Thackeray faction may contest municipal elections independently if not given due respect within Mahavikas Aghadi.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 11 Oct : लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडी म्हणून लढलेल्या इचलकरंजीमधील महाविकास आघाडीमध्ये प्रमुख 3 पक्षांमध्ये बिनसले आहे. काल ठाकरेंच्या शिवसेनेने मेळावा घेतला.

या मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीत सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास, इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार, अशी घोषणा जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी केली.

शिवसेना इचलकंरंजी शहर कार्यालय येथे आगामी महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात पदाधिकारी व निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांशी संवाद साधण्यासाठी जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित केली होती.

Shiv Sena UBT Ichalkaranji
OBC Reservation : 'नागपुरातील मोर्चा ओबीसींचा नव्हे काँग्रेसचा...' मनोज जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'राहुल गांधींच्या सांगण्यावरून...'

या बैठकीमध्ये बोलताना उगळे म्हणाले की, 'इचलकरंजीच्या 16 प्रभागांमध्ये शिवसेनेची ताकद असून ज्यावेळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. महाविकास आघाडीची बैठक होईल त्यामध्ये शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा आघाडीमधून मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी जोर धरावा व जास्तीत जास्त जागा शिवसेनेच्या पदरात पाडून घ्याव्यात.'

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी इचलकरंजीमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपरिषदेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जातील.,अशी घोषणा केली होती.

Shiv Sena UBT Ichalkaranji
Ajit Pawar : 'पिंपरी-चिंचवडप्रमाणे पुण्याची सूत्रे माझ्या हाती दिल्यास...', अजितदादांकडून स्वबळावर निवडणुका लढण्याचे संकेत; नेमकं काय म्हणाले?

मात्र, महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय असणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com