Ichalkaranji Mayor Election : इचलकरंजी महापौर-उपमहापौर पद निवडीचा कार्यक्रम चुकीचा? फेरनिवडणूक राबवावी लागण्याची शक्यता

Ichalkaranji Municipal Corporation : इचलकरंजी महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पद निवडीचा कार्यक्रम नगरसचिवांनी जाहीर केला आहे. त्यानुसार २९ जानेवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशीत पत्र सादर करण्यास मुदत दिली आहे. या मुदतीनंतर पूर्ण तीन दिवस झाल्यावर महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक घेणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Ichalkaranji Mayor Election | Technical Error Row
Ichalkaranji Mayor Election | Technical Error RowSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 09 Feb : इचलकरंजी महापालिकेचा महापौर-उपमहापौरपद निवडीचा कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याची बाब समोर येत आहे. याबाबत तक्रार झाल्यास या दोन्ही पदांची फेरनिवडणूक प्रक्रिया राबवावी लागू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रशासनाकडून मात्र महापालिका अधिनियमानुसारच निवडीचा कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे याबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इचलकरंजी महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पद निवडीचा कार्यक्रम नगरसचिवांनी जाहीर केला आहे.

त्यानुसार २९ जानेवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशीत पत्र सादर करण्यास मुदत दिली आहे. या मुदतीनंतर पूर्ण तीन दिवस झाल्यावर महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक घेणे अपेक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुसार निवडीची प्रक्रिया १० फेब्रुवारी रोजी होणे आवश्यक होते. पण ९ फेब्रुवारीला निवड प्रक्रिया होत असल्यामुळे महापालिका अधिनियमानुसार तीन दिवस पूर्ण होत नाहीत.

Ichalkaranji Mayor Election | Technical Error Row
Sunil Shelke NCP : भाजपच्या सत्तेला अजितदादांचा शिलेदार लावणार सुरुंग! जिल्हा परिषद निवडणुकीत इतिहास बदलणार?

साहजिकच निवडीचा कार्यक्रम तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे समोर येत आहे. याबाबत प्रशासनातील काही अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांनी दुजोरा दिला आहे. जर याबाबत योग्य ठिकाणी तक्रार दाखल केल्यास महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीचा कार्यक्रम पुन्हा घेण्याची नामुष्की येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Ichalkaranji Mayor Election | Technical Error Row
ZP Panchayat Samiti Election Result LIVE : माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्या घरातील 4 उमेदवार पराभूत

त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून याबाबत महापालिकेतील अधिनियमातील तरतुदीची अधिक खातरजमा करण्याचे काम करण्यात येत होते. महापालिका प्रशासनाच्या मते नामनिर्देशितपत्र अर्ज दाखल करण्यास पुरेसा वेळ दिला आहे. त्यामुळे या निवडीच्या कार्यक्रमात कोणतीही तांत्रिक चूक राहिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

महापौर-उपमहापौरपदाच्या निवडीचा कार्यक्रम महापालिका अधिनियमानुसारच घेण्यात आला आहे. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक चूक झाली आहे, असे आम्हाला वाटत नाही असे नंदू परळकर, उपायुक्त, निवडणूक विभाग यांनी सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com