Ichalkaranji Politics : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत आवाडे-हाळवणकरांची भूमिका काय असणार याकडे महाविकास आघाडीचंही लक्ष

Ichalkaranji Municipal Election : इचलकरंजी महापालिकेच्या राजकारणात सध्या तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना दिसत आहे. पण भविष्य काळातील राजकारण पाहता महायुतीमधील अंतर्गत जागावाटपाचा वाद कळीचा मुद्दा ठरू शकतो. त्याचे आतापासूनच संकेत मिळत आहेत.
suresh halvankar and Prakash awade
suresh halvankar and Prakash awade sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 18 Jun : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महानगरपालिकेची यंदा पहिलीच निवडणूक आहे. सर्वोच्च न्यायालयाने महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून राजकीय पक्षांनी देखील हालचाली गतिमान केल्या आहेत. सध्या महायुत्ती एकत्रित लढणार असल्याचा निर्णय जिल्हा पातळीवर घेतला असला तरी इचलकरंजीतील राजकीय परिस्थिती मात्र वेगळी आहे. इचलकरंजीतील विद्यमान आमदार भाजपचे आहेत.

त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेत सध्यातरी भाजप मोठा भाऊ असल्यामुळे भाजपकडून स्वतंत्र लढण्याचा नारा दिला जात आहे. त्यामुळे महायुतीत देखील बेबनाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागून राहिले आहे.

इचलकरंजी महापालिकेच्या राजकारणात सध्या तरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना दिसत आहे. पण भविष्य काळातील राजकारण पाहता महायुतीमधील अंतर्गत जागावाटपाचा वाद कळीचा मुद्दा ठरू शकतो. त्याचे आतापासूनच संकेत मिळत आहेत.

suresh halvankar and Prakash awade
Shivsena UBT On PM Modi : "सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली तेच आता शांतीची कबुतरे सोडीत आहेत..."; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाने मोदींना डिवचलं

नुकतीच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला आहे. याच निर्णयानुसार इचलकरंजी महानगरपालिकेत महायुती म्हणूनच सामोरे जाणार का? याकडे देखील इचलकरंजीकरांचे लक्ष आहे.

सध्या इचलकरंजी महानगरपालिकेत महायुती मजबूत दिसत असली तर त्याला अंतर्गत कांगोरे अधिक आहेत. भाजपमध्ये देखील अंतर्गत वादाची ठिणगी यापूर्वी पडली आहे. माजी आमदार हाळवणकर आणि आमदार आवाडे यांच्यागटात अंतर्गत धुसफूस सुरू. त्यांच्यात जागा वाटपाचा गुंता सोडविताना पक्षीय पातळीवर मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

suresh halvankar and Prakash awade
Dhule Cash Scam : धुळ्यातील विश्रामगृहावर सापडलेल्या रकमेबाबत राऊतांनी CM फडणवीसांना लिहिलं पत्र, अधिकाऱ्यांचा आकडा अन् रेशन दुकानदारांचं टार्गेटच सांगितलं

सध्या भाजपकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक असणार आहे, तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. महायुती झाल्यास जागा वाटपाचा मोठा गुंता निर्माण होऊ शकतो.

महायुतीच्या तुलनेने महाविकास आघाडीची ताकद कमी आहे. त्यामुळे महायुतीला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून एक चिन्हाचा प्रयोग केला जाण्याची शक्यता आहे. त्यावरच सुरुवातीपासून भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी नगरपालिका निवडणुकीत आवाडे विरोधक एकत्र येत शहर विकास आघाडी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com