Ichalkaranji Politics : इचलकरंजीत भाजप-राष्ट्रवादीचं जमेना, काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत

Ichalkaranji BJP–NCP Seat Sharing : इचलकरंजी महापालिका निवडणूक भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही.
Hasan Mushrif and Prakash Awade
Senior leaders including Hasan Mushrif and Prakash Awade during seat-sharing talks ahead of the Ichalkaranji Municipal election, highlighting BJP–NCP political differences.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 19 Dec : इचलकरंजी महानगरपालिकेत काल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यात जागा वाटपा संदर्भात चर्चा झाली. मात्र या बैठकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर जमेना असं चित्र आहे.

दोघांमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झाले नाही. परिणामी, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवून पहिला महापौर आपलाच करण्याचा निर्णय झाला. ज्या ठिकाणी महायुती म्हणून शक्य आहे त्याठिकाणी एकत्र लढण्याचा निर्धार करण्यात आला.

तर ज्या ठिकाणी महायुती शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा निर्णय झाला. जागा वाटपा संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फॉर्म्युला निश्चित करण्याचे यावेळी ठरले. कोल्हापुरात झालेल्या बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे उपस्थित होते.

Hasan Mushrif and Prakash Awade
Ichalkaranji Politics : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इचलकरंजीत महाविकास आघाडीत भूकंप; भाजपने काँग्रेसचा शहराध्यक्ष फोडला

इचलकरंजी महापालिका निवडणूक भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. घटक पक्षांनी केलेली जागांची मागणी पाहता सहजासहजी तोडगा निघणे अशक्य वाटत आहे.

Hasan Mushrif and Prakash Awade
Sanjog Waghere News : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट;अजित पवारांना चकवा, उद्धव ठाकरेंना दणका! संजोग वाघेरे भाजपमध्ये

तथापि, भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होईल, असे चित्र आहे. त्यांच्यातील जागा वाटपाचाही प्रश्न पुढील एक दोन दिवसांत मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केलेल्या जागा आणि भाजपकडून दिल्या जाणाऱ्या जागांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे गुंता वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com