Sanjog Waghere News : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट;अजित पवारांना चकवा, उद्धव ठाकरेंना दणका! संजोग वाघेरे भाजपमध्ये

Sanjog Waghere Shiv Sena UBT Ajit Pawar : पिंपरी चिंचवडच्या राजकारण उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शहराध्यक्ष संजोगे वाघेरे यांनी राजीनामा दिला आहे.
 Sanjog Waghere Patil
Sanjog Waghere Patil Sarkarnama
Published on
Updated on

PCMC Election : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी राजीनामा दिला आहे. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता असताना अजितदादांना चकवा देत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

वाघेरे यांनी स्वतः सांगितले की ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पिंपरी-चिंचवडचे महापौरपद देखील त्यांनी भूषवले आहे. त्यांची पत्नी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. पवार कुटुंबीयांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात.

अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भेटीगाठी घेतल्या होत्या तेव्हा संजोगे वाघेरे हे सहपरिवार अजित पवारांना भेटले होते. त्यामुळे वाघेरे हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची चर्चा सुरू झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी श्रीरंग बारणे यांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.

 Sanjog Waghere Patil
Ichalkaranji Politics : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इचलकरंजीत महाविकास आघाडीत भूकंप; भाजपने काँग्रेसचा शहराध्यक्ष फोडला

भोसरीतून सुत्र हलवली...

संजोगे वाघेरे हे राष्ट्रवादीमध्ये येण्याची शक्यता असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. वाघेरे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पडद्यामागून हालचाली केल्याची चर्चा आहे. लांडगे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि संजोगे वाघेरे यांच्या बैठक झाल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला.

दोन दिवसात पक्षप्रवेश

संजोगे वाघेरे यांनी दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पिंपरी भाजपमधून त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यात येत आहे. माजी नगरसेवक संदीप वाघेरे गट आक्रमक झाला असून संजोग वाघेरे भाजपमध्ये आले तर भाजप सोडण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे तूर्तास संजोग वाघेरे यांचा पक्ष प्रवेश थांबवल्याची चर्चा आहे.

 Sanjog Waghere Patil
Annasaheb Patil: अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष अन् एमडीमध्ये शीतयुध्द! अध्यक्षांनी केले गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com