Ichalkaranji Politics : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इचलकरंजीत महाविकास आघाडीत भूकंप; भाजपने काँग्रेसचा शहराध्यक्ष फोडला

Ichalkaranji municipal election : महाविकास आघाडीतील प्रभावी नाव असलेले शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती समजतात आघाडीच्या नेतेमंडळींनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केल्याचे समजते. पण त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा ठाम निश्चय केला असल्याचे समोर येत आहे.
Ichalkaranji Politics
Ichalkaranji Municipal Corporation Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 19 Dec : इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर आहेत.

पक्ष प्रवेशाबाबत त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत चालले आहे.

महाविकास आघाडीच्या इच्छुकांच्या मुलाखती आज पूर्ण होत असतानाच एक धक्कादायक राजकीय घडामोड समोर येत आहे. महाविकास आघाडीतील प्रभावी नाव असलेले शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Ichalkaranji Politics
Satara Drugs Case: सातारा ड्रग्ज प्रकरणात शिंदेंच्या सेनेनंतर आता अजितदादांची राष्ट्रवादी अडचणीत; राष्ट्रवादीचा पदाधिकारी मास्टरमाईंड?

याबाबतची माहिती समजतात आघाडीच्या नेतेमंडळींनी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केल्याचे समजते. पण त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा ठाम निश्चय केला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात त्यांचा भाजप प्रवेश निश्चित होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

कांबळे यांनी यापूर्वी नगरपालिका असताना उपनगराध्यक्ष पदावर तसेच अन्य महत्वाच्या समितीच्या सभापती पदावर काम केले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याचीही त्यांनी तयार केली होती. सध्या ते महापालिका निवडणूक लढविण्याची तयारीत आहेत. यापूर्वीही अनेकवेळा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

Ichalkaranji Politics
Annasaheb Patil: अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष अन् एमडीमध्ये शीतयुध्द! अध्यक्षांनी केले गंभीर आरोप

मात्र ते आघाडीतच राहणार असल्याचा दावा नेते मंडळीकडून केला होता. तथापी, गेल्या एक-दोन दिवसात पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अचानक झालेल्या या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com