

Satara, 12 October : शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी कोणाला नडू शकतो. माझी कोणतीही टेस्ट केली तर मी निर्व्यसनी आहे, हेच पुढे येईल. शिक्षक काय करतात, हे आम्हालाही चांगलं माहिती आहे. तसेच, पदवीधरांनी मला निवडून दिलं, तर तुम्हाला रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागणार नाही. तुमचे लीडर लेचेपेचे आहेत. लीडर हा डॉ. अभिजीत बिचुकलेसारखा हवा. मला तुम्ही विजयी केले तर मी देवाभाऊंच्या नाकीनऊ आणेन. माझं एकच ब्रीदवाक्य आहे, ते म्हणजे...मैं खडा तो सरकारसे बडा... असे म्हणत शिक्षक आणि पदवीधरांना निवडून देण्याचे आवाहन पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजित बिचुकले यांनी केले.
अभिजीत बिचुकले म्हणाले, पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची मागील २०२० ची निवडणूकही मी लढवली होती. विद्यमान शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी निवडून आल्यानंतर मदारसंघात आपला चेहराही दाखवलेला नाही. सातारा जिल्ह्यातील शिक्षकांचे शंभर टक्के मतदान मला मिळावं. कारण आजवर कधीही शिक्षक आमदार झालेला नाही. ते तुम्ही करून दाखवावं.
तुम्ही महाविकास आघाडी किंवा महायुती सोबत राहू नका. पूर्वी संघटनेच्या वतीने शिक्षक आमदारकी लढवली जायची. आता पक्ष आल्याने ते तुम्हाला गुलाम बनवत आहेत, हे विद्यमान आमदारांनी सिद्ध केले आहे आणि बाकीच्या गोष्टी मला सांगायला लावू नका.
महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे, त्यामुळे तिथं एकमेकांचं कोणी ऐकत नाही, त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभिजीत बिचकुले काय करू शकतो, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कोणाला नडू शकतो, असेही बिचुकले यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, शिक्षकांनो, तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी अभिजीत बिचकुले यांना निवडून द्या. निवृत्त शिक्षकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक वसाहत उभारण्यासाठी सरकारकडून जमीन मिळवून देईन. जुनी पेन्शन योजना आणण्यासाठी अभिजीत बिचकुलेच पाहिजे, कारण विद्यमान आमदारांनी त्यासाठी काहीही केलेले नाही, असा आरोपही बिचकुले यांनी केला.
विश्वजित कदम आणि माझे तंटे...
विश्वजित कदम आणि माझे तंटे आहेत. आमच्या दोघांचे तू तू मै मै आहे. पण तरुणांना त्या ठिकाणी रस्त्यावर कशाला बसवताय. विश्वजित कदम आणि रोहित पवार यांनी बसल्यानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, परीक्षा द्याव्यात, असा सल्लाही अभिजित बिचुकले यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.