Maharashtra MVA Crisis : डिलिमिटेशनच्या बहुमतासाठी मोदींची फोडाफोडी? शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संभ्रम; 'मविआ'ला सुरूंग!

Prithviraj Chavan alleges political horse-trading over the Delimitation Bill, raising questions over Sharad Pawar NCP and Uddhav Thackeray Shiv Sena : काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा; डीएमकेपासून तृणमूल, आप आणि शिवसेनेतील फुटीर गटांपर्यंत बहुमताचे गणित मांडले
Maharashtra MVA Crisis
Maharashtra MVA CrisisSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delimitation Bill Maharashtra : डिलिमिटेशन विधेयकावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला सुरूंग लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाबाबत संभ्रमावस्था आहे.

यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मंजूर केलेल्या मसुद्याचा दाखला देत, डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी मतांची कशी जुळवा जुळव केली, यावर मोठे भाष्य केले आहे. शरद पवार राष्ट्रवादी, डीएमके यांचा पाठिंब्याची शक्यता आणि शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची फोडाफोडीतून मिळवलेले खासदार, हे सर्व विधेयकासाठी आवश्यक असलेले बहुमतांचे अंकगणित पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, "केंद्रातील भाजप मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले म्हणजे, उद्देश स्पष्ट आहे की, सहा महिन्यांपूर्वी संसदेत मांडण्यात आलेले विधेयक पुन्हा आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यावेळी हे विधेयक दोनतृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने मंजूर होऊ शकले नव्हते." आता तेच विधेयक किंवा तोच प्रस्ताव पुन्हा मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावरून सरकारने आवश्यक ते दोनतृतीयांश बहुमत मिळवले असावे, असा दावा चव्हाण यांनी केला.

केंद्रातील भाजप मोदी सरकारने (Modi Government) जर विधेयकासाठी बहुमत गोळा केले असेल, तर ते सरळ मार्गी न करता, राजकीय डावपेचांच्या माध्यमातून मिळवले आङे, हे सांगताना, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह विविध पक्षांमधील फुटीर गटांना फोडून बहुमत मिळवले आहे, असे टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

Maharashtra MVA Crisis
Ahilyanagar third Lok Sabha constituency : अहिल्यानगरला तिसरा खासदार मिळणार? डिलिमिटेशनच्या नव्या फॉर्म्युल्यात श्रीरामपूरची चर्चा; 48 वरून महाराष्ट्रात 72 जागा!

हे फोडाफोडीचे गणित मांडताना, चव्हाण यांनी, रालोआला डीएमकेचा पाठिंबाही मिळाला असावा. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही चर्चा सुरू आहे. काही अटींवर त्यांनीही सरकारला पाठिंबा दिला असावा, अशी मोठी शक्यता वर्तवली आहे.

Maharashtra MVA Crisis
Delimitation Bill : डिलिमिटेशनवर मोदींचा मास्टरस्ट्रोक! 50% जागावाढीने विरोधकांची कोंडी; डीएमके, शरद पवारांच्या पक्षाची भूमिका बदलणार?

डिलिमिटेशनसाठी काँग्रेसची ही प्रमुख मागणी

दोनतृतीयांश बहुमताशिवाय संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणे किंवा संसदेत विधेयक पुन्हा मांडणे शक्य होणार नाही, ही साधी वस्तुस्थिती आहे. सरकारने आवश्यक संख्याबळ जमवलेले दिसते हे सांगताना, आमचा डिलिमिटेशन प्रक्रियेला विरोध नाही. मात्र, त्यासाठी वापरण्यात येणारा लोकसंख्येचा आधार 1971 च्या जनगणनेचा असला पाहिजे. 1971 मध्ये निश्चित करण्यात आलेले राज्यांमधील लोकसंख्येचे सापेक्ष प्रमाण कायम ठेवले पाहिजे, या गंभीर मुद्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

डिलिमिटेशनसाठी 'महिलां'ची ढाल

महिला आरक्षण विधेयकाची तातडीने अंमलबजावणी करण्याची आमची, काँग्रेसची प्रमुख मागणी आहे. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण यांचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही हे सांगताना, महिला आरक्षण विधेयक पूर्वीच मंजूर झाल्याकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. त्याची अंमलबजावणी केंद्रातील भाजप मोदी सरकार करत नाही. उलट डिलिमिटेशन विधेयकासाठी महिला आरक्षण विधेयकाची ढाल केल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

मविआ फुटणार?

शरद पवार राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्ष देखील वेगळ्या विचारात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत संभ्रमावस्था निर्माण झाली असून, डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाल्यास, राज्यातील महाविकास आघाडी संपुष्टात येईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.