Uddhav Thackeray-Shahajibapu Patil
Uddhav Thackeray-Shahajibapu PatilSarkarnama

उद्धव ठाकरे सांगोल्यात आले तर आनंदच; पण मी स्वागताला जाणार नाही : शहाजीबापूंची भूमिका

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी नेहमी सज्ज असेन : शहाजी पाटील

सांगोला (जि, सोलापूर) :  शिवसेना (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सांगोल्यात (Sangola) येणार असतील, तर मला आनंदच होईल. परंतु मी त्यांच्या स्वागतासाठी असणार नाही, त्यांचे कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या स्वागतासाठी नेहमी सज्ज असेन, अशी प्रतिक्रिया सांगोल्याचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांनी दिली. (If Uddhav Thackeray comes to Sangola, I will not go to the reception : Shahajibapu Patil)

उद्धव ठाकरे पुढील महिन्यात सांगोल्यात सभा घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात ते २६ किंवा २७ नोव्हेंबर रोजी ही सभा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सांगोल्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत चर्चा झाली. तसेच, ता. ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याविषयी याच बैठकीत चर्चा होणार आहे.

Uddhav Thackeray-Shahajibapu Patil
आढळरावांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

सांगोला तालुक्यात सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या संगेवाडी, मांजरी गावामध्ये नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. नुकसानीच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नावर  आमदार शहाजी पाटील यांनी वरील उत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सत्तेतून बाहेर पडलेले आमदार बच्चू कडू व रवि राणा यांच्यातील वादाबद्दल आमदार पाटील म्हणाले की, हे दोघेही मोठे नेते असून लवकरच यांच्यातील वाद निश्चितपणे संपुष्टात येईल.

Uddhav Thackeray-Shahajibapu Patil
‘घोडगंगा’त राष्ट्रवादीने विजयाचे खाते उघडले; अशोक पवारांचे चिरंजीव ऋषिराज यांची बिनविरोध निवड

उद्धव ठाकरे पुढील महिन्यात सांगोला दौऱ्यासाठी येणार असून त्यांच्या स्वागत करणार का, असे विचारले असता उद्धव ठाकरे सांगोल्याला येणार असतील तर मला आनंदच होईल. पण, त्यांच्या स्वागतासठी मी जाणार नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांचे स्वागत करतील. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी नेहमी सज्ज असेन असेही शेवटी त्यांनी आवर्जून सांगितले.

Uddhav Thackeray-Shahajibapu Patil
मोहोळमधून संधी मिळाली नसती, तर आज मी माळशिरसचा आमदार असतो : राष्ट्रवादी आमदार मानेंचा गौप्यस्फोट

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागात कोणीही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही. दहा गुंठे पिकाचेही पंचनामे करून अधिकारी, कर्मचारी अहवाल देतील, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com