‘घोडगंगा’त राष्ट्रवादीने विजयाचे खाते उघडले; अशोक पवारांचे चिरंजीव ऋषिराज यांची बिनविरोध निवड

ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या खिशात गेल्याचे त्याचवेळी स्पष्ट झाले होते.
Rishiraj Pawar
Rishiraj PawarSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : शिरूर (shirur) तालुक्यातील ‘रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्या’च्या (Sugar Factory) निवडणुकीत (election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) पॅनेलने विजयी खाते उघडले आहे. कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार (Ashok pawar) यांचे चिरंजीव ऋषिराज पवार (Rishiraj Pawar) यांची ‘ब’ वर्ग गटातून बिनविरोध निवड झाली आहे. ऋषिराज यांच्या बिनविरोध निवडीने तालुक्यात नव्या नेतृत्वाची सलामी झडली आहे. ऐन पंचविशीतच एक उच्चशिक्षित तरुण घोडगंगा फॅक्टरीचा 'डायरेक्टर' झाल्याने सामान्य शेतकऱ्यांच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. (Rishiraj Pawar was elected unopposed in Ghodganga sugar factory election)

ऋषिराज पवार हे, घोडगंगा साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार महर्षि (स्व.) रावसाहेबदादा पवार यांचे नातू असून, कारखान्याचे तब्बल २५ वर्षे अध्यक्ष असलेल्या आमदार ॲड. अशोक पवार व जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार या दांपत्याचे चिरंजीव आहेत. ऋषिराज हे बी. टेक एम. बी. ए. असे उच्चशिक्षित आहेत. रावसाहेबदादा व अशोकबापूंच्या तालमीत तयार झालेल्या ऋषिराज यांची अशोक पवार यांच्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने राजकारणात 'एण्ट्री' झाली. त्यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी जनसामान्यांशी थेट संवाद साधून सभांचे फड गाजविले. त्या निवडणुकीत अशोक पवार तब्बल ४१ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आणि तेथूनच ऋषिराज यांच्या दमदार नेतृत्वाची चाहूल शिरूर-हवेलीकरांना लागली.

Rishiraj Pawar
मोहोळमधून संधी मिळाली नसती, तर आज मी माळशिरसचा आमदार असतो : राष्ट्रवादी आमदार मानेंचा गौप्यस्फोट

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली, तेव्हा ऋषिराज यांच्यासह कुणाच्याही गावी नव्हते की ते थेट कारखान्याचे संचालक होतील. 'ब' वर्ग (सोसायटी मतदार संघ) गटातून २२ सभासद होते. त्यातून दोनच उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यातील एक ऋषिराज पवार यांचा आणि दुसरा त्यांच्या मातुःश्री सुजाता पवार यांचा. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलच्या खिशात गेल्याचे त्याचवेळी स्पष्ट झाले होते.

Rishiraj Pawar
रणजितदादांच्या मंत्रिपदासाठी वकिली करू; भाजपमध्येही आमचे ऐकणारे आहेत : राजन पाटलांचे मोठे वक्तव्य

सुजाता पवार यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेल्या उल्लेखनिय कामाचा आणि अशोक पवार यांच्या विधानसभा निवडणुकीत पडद्यामागे राहून राबविलेल्या नेटक्या संयोजनाचा विचार करता बहुसंख्य जुन्या-जाणत्यांची त्यांच्या नावाला पसंती होती. सुजाताभाभींना संधी द्यावी अशी सर्वसमावेशक मागणी होती. तसा आग्रहही अशोक पवार यांच्याकडे अनेकांनी धरला होता. अखेर मातेने पूत्रासाठी माघार घेतली आणि ऋषिराज पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

Rishiraj Pawar
बारामतीच्या माळेगावात विषारी ताडी प्यायल्याने दोन तरुणांचा मृत्यू

घोडगंगा कारखाना निवडणुकीच्या शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचार शुभारंभाच्या सभेत, या बिनविरोध निवडीबद्दल नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल व त्यांच्या पत्नी दिना धारिवाल यांच्या हस्ते ऋषिराज पवार यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते तसेच कळवंतवाडी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच दादासाहेब चव्हाण यांनीही त्यांचा सन्मान केला.

Rishiraj Pawar
'मी बोअर झालोय, मला गाणं म्हणून दाखव' : अवर सचिवाची महिला अधिकाऱ्याकडे फर्माईश!

राजकीय विरोधकाबरोबर पाहिला ‘पुष्पा’

आमदार पवार यांचे राजकीय विरोधक असलेले माजी आमदार (स्व.) बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांच्याशी काही महिन्यांपूर्वी केवळ संवाद साधूनच ते थांबले नव्हते तर दोघांनी थिएटर मध्ये एकत्र बसून 'पुष्पा' या चित्रपटाचा आनंदही घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com