Dr. Sujay Vikhe Patil : महसूलची बेकायदा वसुली बंद करणार

राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) येथे विश्वनाथ कोरडे मित्र मंडळाने आयोजित मेळाव्यात खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) बोलत होते.
Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Dr. Sujay Vikhe Patil : पारनेर तालुक्यात तहसीलदार कार्यालयात विविध कामांना एजंट मार्फत जी बेकायदा वसुली सुरू होती ती आता बंद होणार आहे. सामान्य लोकांचे रेशनकार्ड, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना यासह अन्य कामांसाठी जी वसुली केली जात होती ती लुटमार बंद करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी केले.

राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) येथे विश्वनाथ कोरडे मित्र मंडळाने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सुजित झावरे पाटील,राहुल शिंदे पाटील, विकास रोहकले, शंकर नगरे, सुभाष दुधाडे, सुनील थोरात, बापू भापकर, सागर मैड, शिवाजी सालके, युवराज पाटील, दिलीप भालसिंग, शिवाजी सालके, उपस्थित होते.

Dr. Sujay Vikhe Patil
Vikhe Patil News : विखे पाटील आमदार नाहीत तर नामदार : सुजय विखेंनी केली चूक दुरुस्त

विखे पाटील म्हणाले, सत्ता येत जात आसते मात्र त्या सत्तेचा वापर आपण खोटे गुन्हे दाखल करणे,तहसीलदारांना स्वतंत्र नावे देऊन कारवाई करण्यास भाग पाडणे, पोलीस यंत्रणेचा चुकीचा वापर करून इतर पक्षातील लोकांना त्रास देणे ही चुकीची पध्दत होती ते सर्व आता बंद होईल.

विखे पाटलांना कोणीही वाळु तस्कर मोठा करायचा नाही मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर बेकायदा वाळू उपसा बंद झाला आहे.मागील अडीच वर्षातील चेहरे जुनेच आहेत मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जे नवीन चेहरे सत्कारासाठी येतात त्यांचे विशेष वाटते ते कधी आपले नव्हते आज सत्ता आली म्हणून ते येत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Dr. Sujay Vikhe Patil
विखे पाटील आता हेवीवेट मंत्री : भाजपमध्ये वजन वाढले

पक्ष वाढीसाठी कोरडे यांचे काम इतरांना दिशादर्शक

पक्षाचा आमदार नसताना पक्ष संघटनेचे काम वाढविणे अवघड आसते मात्र कुठलिही जाहीरात बाजी न करता विश्वनाथ कोरडे हे पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात पक्ष वाढीसाठी कोरडे यांचे काम इतरांना दिशादर्शक असल्याचे खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Satara Dcc Bank Election
Shambhuraj Desai-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Shivrupraje Khardekar-Ramraje Naik Nimbalkar
Chandrakant Patil, Vishal Patil, Jayant Patil
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com