Solapur MLC : राजेंद्र राऊतांनी अर्ज घेताच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाणांची पंढरपूरकडे धाव; प्रशांत परिचारकांशी खलबतं...

Shashikant Chavan meet Prashant Paricharak : सोलापूर विधान परिषद उमेदवारीवर अद्यापही सस्पेन्स कायम असून शशिकांत चव्हाण आणि प्रशांत परिचारक यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.
Prashant Paricharak-Shashikant Chavan
Prashant Paricharak-Shashikant ChavanSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 31 May : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिलेले असतानाही विधान परिषदेच्या उमेदवारीचा सस्पनेस कायम आहे. मात्र गेली दोन दिवसांपासून जोरदार घडामोडी घडताना दिसून येत आहेत. उमेदवारीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव चर्चेत असताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपच्या उमेदवारीसाठी अर्ज घेतला आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची पंढरपुरात जाऊन परिचारक यांची भेट घेतल्याचे पुढे आले आहे, या भेटीत नेमकं काय घडलं, याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून पहिल्या दिवसापासून माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव आघाडीवर होते. अनेक राजकीय तज्ज्ञांचा होराही परिचारक यांच्या उमेदवारीच्या बाजूने होता. मात्र, शनिवारपर्यंत परिचारक किंवा त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्जही नेला नव्हता, त्यामुळे त्यांच्या गटात चलबिचल वाढली आहे.

परिचारक यांचे नाव आघाडीवर असताना बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शनिवारी भाजपच्या उमेदवारी अर्ज घेतल्याचे पुढे आले आहे. त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली होती. विशेष म्हणजे त्यांचा पालकमंत्री गोरे यांच्यासोबतचा विमान प्रवासही गाजला होता, त्यामुळे उमेदवारी राऊतांना की परिचारक यांना याबाबत संभ्रम वाढत चालला आहे.

Prashant Paricharak-Shashikant Chavan
Govindpur Mass Murder : सोलापूर सीमाभाग सहा जणांचे हत्याकांड : जमीन खरेदीला अगोदर संमती दिली अन्‌ काही दिवसांतच उलटले

दरम्यान, माजी आमदार राऊत यांनी शनिवारी अर्ज घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी पंढरपूर गाठले. त्या ठिकाणी त्यांनी प्रशांत परिचारक यांच्याशी चर्चा केल्याचे पुढे आले आहे. मात्र, त्याचा तपशील समजू शकला नाही.

Prashant Paricharak-Shashikant Chavan
Congress News : काँग्रेसने मोठा डाव टाकला, विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला! धाराशिव-बीड-लातूरमधून नव्या चेहऱ्याला संधी

आवताडे गटात अस्वस्थता

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाची घोषणा होत नसल्याने पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटातही अस्वस्थता वाढली आहे. कारण आवताडे यांच्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून परिचारक यांनी दोनवेळा विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे, त्यामुळे परिचारक यांना संधी न मिळाल्यास विधानसभेला ते पुन्हा स्पर्धक होऊ शकतात, याची चिंता आवताडे गटाला आहे, त्यामुळे उमेदवारीचा निर्णयाकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com