Solapur Congress : प्रभारी जोशींचा 15 दिवसांचा वायदा; पण दीड महिन्यानंतरही सोलापूर काँग्रेसला मिळेना जिल्हाध्यक्ष!

District president Issue : त्या दौऱ्यानंतर जोशी यांनी काही नावे हायकमांडकडे जिल्हाध्यक्षपदासाठी पाठवली होती. तसेच, पंधरा दिवसांत सोलापूर काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळेल, असे 20 मे रोजी जाहीर केले होते. मात्र, मोहन जोशी यांचा तो दावाही फोल ठरला आहे.
Solapur Congress
Solapur CongressSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 July : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस वगळता सर्व राजकीय पक्षाने नव्याने जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. मात्र, काँग्रेसला अद्यापही जिल्हाध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. सोलापूर काँग्रेसला 15 दिवसांत नवा जिल्हाध्यक्ष मिळेल, असे पक्षाचे प्रभारी मोहन जोशी यांनी 20 मे रोजी जाहीर केले होते. मात्र, अद्याप जिल्हाध्यक्ष जाहीर होऊ शकलेला नाही, त्यामुळे सोलापूरची उरली सुरली काँग्रेस पुन्हा गटबाजीत अडकली काय, अशी चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीमधील सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. या तीनही पक्षांत सध्या इनकमिंग जोरात आहे. पण महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्याचे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठका होत आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष (Congress)अजूनही तसा शांत असल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यात काँग्रेस वगळता सर्वच राजकीय पक्षांनी आपले जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत. यात भाजपने दोन, शिवसेनेने तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पण काँग्रेसला निवडणूक जिंकून देऊ शकणारा सक्षम चेहरा अजूनही मिळाला नसल्याचे दिसून येत आहे.

सोलापूर काँग्रेसचे प्रभारी मोहन जोशी हे मे महिन्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दौरे करून प्रमुख काँग्रेस नेत्यांशी चर्चा करत जिल्हाध्यक्ष निवडीबाबत कानोसा घेतला होता. त्या दौऱ्यानंतर जोशी यांनी काही नावे हायकमांडकडे जिल्हाध्यक्षपदासाठी पाठवली होती. तसेच, पंधरा दिवसांत सोलापूर काँग्रेसला नवा जिल्हाध्यक्ष मिळेल, असे 20 मे रोजी जाहीर केले होते. मात्र, मोहन जोशी यांचा तो दावाही फोल ठरला आहे.

Solapur Congress
Solapur Politic's : सोलापूर विमानतळावरच फडणवीस-कल्याणशेट्टी अन॒ माने यांची चर्चा; दिलीप मानेंची भाजपशी जवळीक वाढली!

धवलसिंह मोहिते पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप करत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आपल्याला पक्षात काम करू दिले जात नाही, असेही मोहिते पाटील यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे धवलसिंह यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तो स्वीकारला नव्हता. शिंदे समर्थक अजूनही सोलापुरातील काँग्रेसच्या पडझडीला पटोलेंना जबाबदार धरतात. त्यामुळे नव्या जिल्हध्यक्षांची नियुक्तीही गटबाजीत अडकली की काय, प्रश्न उपस्थित होत आहे.

Solapur Congress
Fadnavis On Pandharpur Corridor : आमदार समाधान आवताडेंच्या समोरच पंढरपूर कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान....

जिल्हाध्यक्षपदासाठी प्रभारींनी ही नावे पाठवली होती

काँग्रेसचे सोलापूरचे प्रभारी मोहन जोशी यांनी जिल्हाध्यक्षपदासाठी राजकुमार पवार, विजयकुमार हत्तुरे, अरविंद तात्या पाटील, देवानंद गुंड पाटील, नंदकुमार पवार, प्रतापराव जगताप, सातलिंग शटगार, विजय साळुंखे यांची नावे प्रदेश पातळीवर पाठविली होती. आता त्यातील कोणाला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळते, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com