Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : फडणवीस - देशमुखांच्या वादात ट्विस्ट; समित कदमांचा मोठा खुलासा...

Samit Kadam : देशमुखांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मदत करण्याबाबत कदम यांच्याशी चर्चा केली.
Samit Kadam
Samit KadamSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra political News : आजी - माजी गृहमंत्री यांच्यात सुरू झालेल्या वादाला आता नवे वळण लागले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी केंद्रामार्फत दबाव टाकून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याविरोधात खोटे अफिडेव्हिट करण्यास सांगितल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

त्यासाठी फडणवीसांनी समित कदम यांना मध्यस्थी केल्याचाही दावा केला होता. आता त्यावर समित कदम यांनी खुलासा केल्याने या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे.

याबाबत जनसुराक्ष पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याशी एका खासगी वृत्तवाहिनीने संवाद साधला. त्यावेळी कदम यांनी देशमुखांनी केलेला दावा फेटाळून लावला. तसेच देशमुख यांनी स्वतःच भेटायला बोलावल्याचे कदम यांनी सांगितले.

ते म्हणाले, त्यावेळी अनिल देशमुख Anil Deshmukh हे राज्याचे गृहमंत्री होते. सरकारकडून त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती. त्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय त्यांना भेटण्यासाठी मी जाऊ शकत नव्हतो. त्यांनीच मला त्यांच्या शासकिय निवासस्थानी भेटण्यासाठी बोलावले होते, असे कदम यांनी स्पष्ट केले.

देशमुखांशी झालेल्या चर्चेचा विषयावरही कदम यांनी भाष्य केले आहे. यावर त्यांनी, अनिल देशमुख यांनी ते अडचणीत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याशी चर्चा करून मदत करण्याबाबत माझ्याशी चर्चा केली, असा खुलासाही कदम यांनी केला. तसेच यात प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा काहीही रोल नसल्याचा स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Samit Kadam
Sharad Pawar : महाराष्ट्रात 'मणिपूर' घडेल? शरद पवार नेमके काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी मला अनिल देशमुख यांच्याकडे जा, असे कधीही सांगितले नाही. फडणवीस यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. उलट देशमुखांनीच मला तेथे बोलावले होते. मात्र तीन वर्षानंतर देशमुख या प्रकरणावर का बोलत आहेत? अनिल देशमुख हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी अशा लहान सहान गोष्टींवर चर्चा करणे टाळायला हवे होते. त्यांच्यासारख्या नेत्याला हे शोभत नाही, असा टोलाही कदम यांनी यावेळी लगावला.

Samit Kadam
Congress : बहिणींना पैसे नको, रक्षा हवी! काँग्रेसनं शिंदे, फडणवीसांवर निशाणा साधला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com