Dr. Atul Bhosale : आमदार अतुल भोसलेंचा डाव ठरला गेमचेंजर; पृथ्वीराजबाबांच्या बालेकिल्ल्यात प्रथमच कमळ फुलले!

Malkapur Nagar Parishad Election Result : मलकापूर नगरपालिकेत भाजपने इतिहास घडवत नगराध्यक्षपदासह २२ पैकी १८ जागा जिंकल्या. आमदार अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली तेजस सोनवणे यांचा दणदणीत विजय झाला.
Manohar Shinde-Dr. Atul Bhosale
Manohar Shinde-Dr. Atul Bhosale Sarkarnama
Published on
Updated on
  1. मलकापूर नगरपालिकेत पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले असून नगराध्यक्षपदासह २२ पैकी १८ जागांवर भाजपचा दणदणीत विजय झाला.

  2. आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली तेजस सोनवणे यांनी ५,२७७ मतांच्या मोठ्या फरकाने नगराध्यक्षपद जिंकले.

  3. इनकमिंग राजकारण, मनोहर शिंदेंचा करिष्मा आणि संघटनात्मक ताकदीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला.

Karad, 22 December : सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. भाजपने आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली सर्व जागांवर उमेदावर उभे केले होते. त्यात नगराध्यक्षपद आणि २२ पैकी १८ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनवणे यांनी ५ हजार २७७ मताधिक्यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आर्यन कांबळे यांना येथे पराभवाचा धक्क बसला आहे. आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या साथीने माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची जादू याठिकाणी चालली.

मलकापूर नगरपालिका निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय उलथापालथी झाल्या होत्या. भाजपचे डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale) हे कऱ्हाड दक्षिणचे आमदार झाल्यानंतर मलकापूरचीही राजकीय समीकरणे बदलली आहेत. विकासासाठी धडपडणाऱ्या इतर पक्षातील नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांनी भाजपत घेण्याचा सपाटाच लावला.

आमदार डॉ. भोसले यांनी पहिल्या टप्यात कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थकांना भाजपच्या झेंड्याखाली आणले. त्यानंतर चव्हाणांचे कट्टर समर्थक, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे (Manohar Shinde) यांनाच भाजपवासी केले. मलकापूरची एकहाती सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी आमदार डॉ. भोसले यांनी केलेली खेळी यशस्वी ठरली आहे, त्यातूनच भाजपचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडले गेले.

मलकापूरमध्ये भाजपने एकहाती सत्तेसाठी लावलेली फिल्डींग रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना मैदानात उतरविले. राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यपदासह काही जागांवर उमेदवार उभे केले. त्या माध्यमातून ॲड. उंडाळकर यांनी मलकापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा गट तयार करण्याची संधी साधली.

माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भाजपमध्ये गेल्याने तेथे ४२ वर्षांनंतर त्यांचे कट्टर विरोधक असलेले अशोकराव थोरात यांना एकत्र आणण्यात आमदार डॉ. भोसले यांना यश आले. मलकापूरला भाजपमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात झाल्याने उमेदवारी देताना तेथे मोठी कसरतच आमदार डॉ. भोसले यांना करावी लागले.

Manohar Shinde-Dr. Atul Bhosale
Ajit Pawar NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीने आणखी एका राज्यात दाखवून दिली ताकद; ‘स्थानिक’च्या निवडणुकीत केली कमाल

जुन्या-नव्यांचा मेळ घालताना डॉ भोसले यांनी आपले कसब पणाला लावले. मात्र, मूळचे भाजमध्ये असलेल्या अनेकांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्या नाराजीतूनच मलकापूरमध्ये अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातूनही स्वतंत्र पॅनेल उभे केले.

मलकापूर नगरपालिकेच्या मतमोजणीत पहिल्यांदा कमळ फुलले आहे. भाजपने आमदार डॉ. अतुल भोसलेंच्या नेतृत्वाखाली सर्व जागांवर उमेदवार उभे केले. त्यात नगराध्यक्षपद तसेच २२ पैकी १८ जागा भाजपला मिळाल्या. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस सोनवणे यांनी ५ हजार २७७ मताधिक्याच्या फरकाने विजय मिळविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार कांबळे यांना मात्र तेथे पराभवाचा धक्क बसला. पण, मनोहर शिंदेंचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले.

नवख्यांनी मातब्बरांना दाखवले अस्मान

पालिकेच्या निवडणुकीत उशिरा मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी समविचारी आघाडीला केवळ चार जागा मिळाल्या. भाजपने २२-० चा निर्धार केला होता. मात्र, या आघाडीने चार जागा मिळवत यश मिळविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दादा शिंगण यांनी मलकापूरचे माजी बांधकाम सभापती आणि भाजपचे उमेदवार राजेंद्र यादव यांचा ४९ मतांनी पराभव केला.

Manohar Shinde-Dr. Atul Bhosale
Nagar Parishad Result : सोलापुरात भाजपला मोठा धक्का; अकरापैकी तीन ठिकाणी पराभव, चार जागांवर पिछाडीवर

त्याचबरोबर माजी शिक्षण सभापती प्रशांत चांदे यांचा शिवसेनेचे नितीन काशीद यांनी पराभव केला. त्याचबरोबर भीमाशंकर माऊर, मृणालिनी इंगवले यांनी दिग्गजांचा पराभव करत बाजी मारली. ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची ताकदही दिसून आली.

  1. मलकापूर नगरपालिकेत कोणत्या पक्षाचा विजय झाला? – भाजपने नगराध्यक्षपदासह १८ जागांवर विजय मिळवला.

  2. नगराध्यक्षपदी कोण निवडून आले? – भाजपचे तेजस सोनवणे नगराध्यक्षपदी निवडून आले.

  3. तेजस सोनवणे किती मतांनी जिंकले? – त्यांनी ५,२७७ मताधिक्यांनी विजय मिळवला.

  4. या निकालाचे राजकीय महत्त्व काय? – पहिल्यांदाच मलकापूरवर भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com