

Solapur, 15 January : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या मतदानास सकाळी साडेसातपासून सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना सकाळपासून सुरू आहेत. तसेच, शहरात अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे उघड झाले आहे. मतदार मतदान गेल्यानंतर तुमचे मतदान झाल्याचे निवडणूक अधिकारी सांगत आहेत. पडताळीनंतर त्यांचे बॅलेट पेपरवर मतदान घेतले जात आहे. एक मतदान केंद्रावर चक्क निवडणूक कर्मचाऱ्यानेच भाजपचे बटन दाबल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना हाताशी धरून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खुद्द मतदारांकडूनच होत आहे.
सोलापूरमध्ये (Solapur) सत्ताधारी भाजप हा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढत आहेत. महाविकास आघाडीही सोलापुरात एकत्रिपणे निवडणूक लढवत आहे. तसेच असदुद्दीन ओवैसी यांनी दोन सभा घेऊन एमआयएमची वातावरणी निर्मिती करण्याचा प्रयत्न केल आहे.
सोलापूर शहरात अनेक ठिकाणी बोगस मतदान (voting) झाल्याचे उघड होत आहे. बाळे शहरात तशा तीन घटना घडल्याचे पुढे आले आहे. त्यात प्रभाग क्रमांक पाचमधील मतदान केंद्र क्रमांक १७ मध्ये दोन, तर मतदार केंद्र क्रमांक २१ मध्ये एक घडली आहे. प्रभाग 3 च्या 4 नंबर केंद्रवारही बोगस मतदान झाल्याचे पुढे आले आहे.
हे सर्व मतदार मतदानासाठी केंद्रावर गेल्यानंतर ‘तुमचे मतदान झाले आहे,’ असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संबंधित मतदारांचे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले आहे. बाळे येथे मंगल वाघमारे, ह्या मतदानासाठी केंद्रावर गेल्या असताना त्यांना तुमचे मतदान झाल्याचे सांगण्यात आले. त्याबाबतचा जाब विचारल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंगल वाघमारे यांचे मतदान बॅलेट पेपरवर करून घेतले आहे. मात्र, या प्रकाराबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर रेखा सुरवसे यांनाही तोच अनुभव आला आहे. मात्र, त्यांनी मतदान केले नसल्याचे उघड झाल्यानंतर अधिकाऱ्याने त्यांचा रीतसर फॉर्म भरून मतदान करून घेतले आहे. प्रशासनाकडून सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला खतपाणी घातले जाते आहे. मतदारांच्या लोकशाहीतील मतदानाचा हक्कच हिरावून घेतला जात आहे. प्रशासनाला हाताशी धरून असे प्रकार होणार असतील, तर आम्ही मतदानावर बहिष्कारच घालू, असा इशाराही मतदारांनी दिला आहे.
शहरातल्या अनेक ठिकाणी मशिन बंद पडत आहेत. मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालयातील मशीन बंद पडले होते. शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील जुन्या एम्लॉयमेंट परिसरात डेमो ईव्हीएम बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवदारे कॉलेज येथे ईव्हीएम मशीनही बंद पडले होते. प्रभाग आठमध्ये दीड तास मतदान बंद पडले होते. प्रभाग 3 मधील 5 नंबर मशीन बंद पडली हेाती.
दरम्यान, प्रभाग २६ मध्ये उमेदवारांच्या आरक्षणाचे प्रवर्ग मतदान यंत्रांवर बदल करण्यात आल्याने उमेदवारांमधून तीव्र संताप केला आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये एक महिला मतदानासाठी गेली असता तिला मतदान यंत्रातील इच्छित बटन दाबले जात नव्हते. त्याची तक्रार केल्यानंतर संबंधित केंद्रावरील मतदान अधिकाऱ्याने भाजपच्या चिन्हासमोरचे बटन दाबल्याचे उघड झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.