Voter List Confusion : मतदान केंद्रावर गोंधळ, भाजप मंत्र्याचे नावच मतदारयादीतून गायब!

Navi Mumbai Voter List Ganesh Naik : आम्ही मतदान करायचे की नाही? मी इथला आमदार, राज्याच्या मंत्री, आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर सामन्य मतदारांचे काय? असा संतप्त सवाल मंत्री नाईक यांनी केला.
Voter List
Voter List Sarkarnama
Published on
Updated on

Ganesh Naik News : महापालिका निवडणुकीत सकाळपासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या तांत्रिक बिघाडाने मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातच नवी मुंबईत भाजपचे मंत्री गणेश नाईक हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले असता त्यांचे नावच मतदारयादीत नसल्याचे समोर आले.

नवी मुंबईतील शाळा क्रमांक 94 मधील मतदान केंद्रात मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेला मतदान केले होते. मात्र, या वेळी ते मतदानासाठी गेले असता त्यांचे नाव मतदान यादीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ते प्रचंड चिडले. आमच्या कुटुंबातील एकाच बिल्डिंगमध्ये राहणार आम्ही मात्र तीन जणांचे मतदान येथे आहे बाकीच्यांचे नाही. दरम्यान, तपासानंतर त्यांना सांगण्यात आले की त्यांचे मतदान सेंट मेरीक मतदान केंद्रावर आहे.

आम्ही मतदान करायचे की नाही? मी इथला आमदार, राज्याच्या मंत्री, आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर सामन्य मतदारांचे काय? असा संतप्त सवाल देखील नाईक यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विचारला.

Voter List
Mohan Bhagwat News: 'नोटा' बाबत आरआरएस प्रमुखांचे महत्वाचे विधान! मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क

नाईक विरुद्ध शिंदे

मुंबई महापालिकेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. ही निवडणूक गणेश नाईकांनी प्रतिष्ठेची केली असून त्यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केल्याने राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

मतदानाचा हक्क बजावला

गणेश नाईक यांनी सेंट मेरीक मतदान केंद्रात जात आपला मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज लोकशाहीचा कर्तव्यभावनेने सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावला.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे मतदान अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या एका मतातून शहराच्या विकासाची, सुरक्षिततेची आणि उज्ज्वल भविष्यातील दिशा ठरते.नवी मुंबईच्या सर्व मतदार बांधवांनी निर्भयपणे, उत्साहाने आणि जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

Voter List
Pune ZP Elections : पुणे जिल्हा परिषदेची सत्ता 'हे' तीन तालुकेच ठरवणार! अजित पवारांचा कस लागणार! भाजपच प्रमुख विरोधक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com