Solapur DCC Bank : जिल्हा बॅंक निवडणूक; एक आमदार, दोन माजी आमदार अन्‌ माजी संचालकाने घेतली राजेंद्र राऊतांची भेट, बार्शीची राऊत चाळ केंद्रबिंदू...

MLA, Two Former MLA And Dirctor Meet Rajendra Raut : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत आमदार, दोन माजी आमदार आणि माजी संचालकाने राऊतांची भेट घेतली.
Solapur DCC Bank Election
Solapur DCC Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 September : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील आठवड्यात भाजप आमदार आणि नेतेमंडळींची बैठक झाली असून आता भेटीगाठी, राजकीय समीकरणांची बेरीज केली जात आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपकडून आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेतला असून गेल्या दोन दिवसांत एक आमदार, दोन माजी आमदार आणि एका माजी संचालकाने आमदार राऊत यांची भेट घेऊन बॅंकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता बार्शीची राऊत चाळ बनली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे पडद्यम जोरजोरात वाजत आहेत. बॅंकेच्या निवडणुकीसाठी एकूण २ हजार १६५ ठराव झाले आहेत. त्यातील अक्कलकोट तालुक्यातील सहकारी सोसाट्यांचे सहा ठराव रद्द झाले आहेत. त्यामुळे बॅंकेसाठी २१५९ ठराव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर होणार आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात सोलापुरात सहकारी सोसायटी मतदारसंघातील ११ जागांबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. संबंधित तालुक्यातील नेत्याला ती जागा द्यायची आणि इतर सहा जागांचा निर्णय शेवटच्या टप्प्यात घेण्याचे ठरले आहे, त्यामुळे सोलापूर डीसीसी बॅंकेची निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी आग्रही असणारे आमदार राजेंद्र राऊत हे सध्याच्या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू आहेत. त्यांची गेल्या दोन दिवसांत एक आमदार, दोन माजी आमदार आणि एका माजी संचालकाने बार्शीत राऊत चाळीत जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे.

Solapur DCC Bank Election
Shinde Politic's : माढ्याच्या शिंदेंची मोहिते पाटलांना शेवटच्या क्षणी धोबीपछाड; जिल्हा बॅंकेच्या दुग्ध संस्था मतदारसंघावर मिळविला वरचष्मा

करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मात्र विधान परिषद निवडणुकीपासून महायुतीच्या जवळ आलेले करमाळ्याचे आमदार नारायण पाटील आणि त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी बार्शी जाऊन आमदार राऊत यांची भेट घेतली. या भेटीत आमदार नारायण पाटील यांनी निवडणुकीसाठी राऊत यांना सहकार्याचा शब्द दिल्याची माहिती आहे, त्यामुळे आमदार पाटील हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मदत करण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, बॅंकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांनीही राऊतांची भेट घेऊन चर्चा केली आहे. राजन पाटील यांनीही या भेटीची माहिती दिली आहे. जयवंतराव जगताप आणि बबनराव आवताडे यांनी एकत्रितपणे राऊत यांची भेट घेतली आहे.

Solapur DCC Bank Election
Shikhar Pahariya : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; चक्क भाजप कार्यालयाबाहेर उभारले बॅनर

आमदार राजेंद्र राऊत यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या भेटीची आणि त्यामागच्या कारणांची माहिती दिली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू बार्शी शहरातील राऊत चाळ ठरण्याची शक्यता आहे. आता प्रत्यक्षात जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमध्ये कोणकोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sanjay Shinde -Rajendra Raut
BJP Leader Meeting
Solapur Dcc Bank
Prashant Paricharak
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com