ZP Result : नरखेड गटातून उमेश पाटलांचा भावाचा मोठा पराभव; राजन पाटलांनी गड राखला

Mohol Political News : मोहोळ तालुक्यातील नगरखेड जिल्हा परिषद गटातून भाजपचे लखन शिंदे यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांचा ४००० मतांनी पराभव केला.
Santosh Patil-Rajan Patil
Santosh Patil-Rajan PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 08 February : मोहोळ तालुक्यातील नगरखेड जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील हे निवडणूक लढवत होते. मात्र, नरखेड गटातून संतोष पाटील यांचा भाजपचे उमदेवार लखन शिंदे यांनी 4000 मतांनी विजयी झाले आहेत.

माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नरखेड जिल्हा परिषद गटासह नरखेड पंचायत समिती आणि शिरापूर पंचायत समिती तिन्ही जागेवर भाजप विजयी झाले आहेत. यापूर्वी उमेश पाटील यांनी नरखेड गटातून प्रतिनिधीत्व केलेले आहे, त्यामुळे या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

अक्कलकोट तालुक्यातून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू सागर कल्याणशेट्टी चपळगाव गटातून विजयी झाले आहेत, तर त्यांची पत्नी शांभवी कल्याणशेट्टी ह्या चपळगाव गणातून विजयी झाल्या आहेत. माळशिरस तालुक्यातून आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाचा पराभव करत माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते विजयी झाल्या आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यात नान्नज गटातून भाजपच्या चैत्राली मुळे विजयी झाल्या आहेत. करमाळ्यात भाजपच्या रश्मी बागल विजयी झाल्या आहेत. करकंब गटात भाजपचे आदिनाथ देशमुख १११६ मतांनी विजयी झाले आहेत. माढा तालुक्यातून भाजपाचे पृथ्वीराज सावंत हे मानेगावातून विजयी झाले आहेत.

Santosh Patil-Rajan Patil
Solapur ZP Result : सोलापुरात मोहिते पाटील, जानकरांना धक्का; सातपुते, सावंत, कल्याणशेट्टी, चैत्राली मुळे यांचा विजय

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गटातून भाजपचे अनिल वैद्य, तर गणातून भाजपच्या मीनाक्षी रोंगे विजयी झाल्या आहेत. बोरामणी जिल्हा परिषद गटातून भाजपचे नेताजी खंडागळे हे ८४४ मतांनी, बोरामणी गणातून भाजपच्या वर्षा पटणे २१३९ मतांनी, तर कासेगाव गणातून भाजपचे विजय राठोड हे २२८८ मतांनी विजयी झाले आहेत.

दहीगाव गटात संस्कृती सातपुते विजयी, तर गुरसाळे गण - दत्तात्रय विठोबा शेळके, तर दहिगाव गणातून नुजा बाळू खिलारे हे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. आष्टी गटातून विजयराज डोंगरे हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Shiv Sena MLAs are preparing for the upcoming Nashik Zilla Parishad elections, with rural political influence emerging as a key focus.
Ranjitsinh Mohite-Patil Meet Dharmraj kadadi
NCP ZP Member Meet Sunetra Pawar
Solapur ZP President| Rajendra Raut | Deepak Vaidya
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com