Harshvardhan Patil : 'दलबदलू' चा 'अद्श्य हात' म्हणणाऱ्या अजितदादांना हर्षवर्धन पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले 'मी पहाटे जात...'

Harshvardhan Patil Criticized Ajit Pawar : इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रेय भरणे अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील निवडणूक लढत आहेत.
Ajit Pawar, Harshvardhan Patil
Ajit Pawar, Harshvardhan Patil Sarkranama
Published on
Updated on

Indapur Assembly Election: आम्हाला लोकसभा निवडणुकीत आश्वासने दिली. त्यांच्या घरी आम्हाला बोलावले. जेवू घातले, पण प्रत्यक्षात अदृश्य हात 'तुतारी'साठी वापरला, असे तुम्ही म्हणत असाल, तर ही गोष्ट कोणत्या नैतिकेत बसते? दलबदलू, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांवर केली होती.

अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्युत्तर देत असताना अजित पवार हे पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेण्यासाठी गेले होते. त्या घटनेचा उल्लेख अजित पवारांचे नाव न घेता काढत अजित पवारांना टोला लगावला.

पवारसाहेबांच्या सोबत जावे म्हणून सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मी पहाटे उठून कुठे जात नाही. आमचा सगळा कारभार हा जनतेमध्ये असतो. त्यामुळं जनतेचा आग्रहाखातीर आम्ही पवारसाहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.

Ajit Pawar, Harshvardhan Patil
Babanrao Gholap : ...अन् बबनराव घोलप यांनी केली 'घरवापसी' ; हाती बांधून घेतलं 'शिवबंधन'!

इंदापूर विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रेय भरणे अशी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील निवडणूक लढत आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रेय भरणे उमेदवार आहेत.

प्रवीण माने मैदानात

हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. प्रवीण माने हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Ajit Pawar, Harshvardhan Patil
Sada Sarvankar Video : अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com