Krishna Sugar Election : इंद्रजित मोहितेंच्या ‘सायलेंट मोड’ने कार्यकर्त्यांचे वाढविले टेन्शन; भोसले, आबासाहेब मोहिते गटाचा शड्डू

Indrajeet Mohite Group : कराडच्या कृष्णा साखर कारखाना निवडणुकीत इंद्रजित मोहिते यांची भूमिका स्पष्ट नसल्याने उत्सुकता वाढली असून भोसले आणि मोहिते गटात रंगतदार लढतीची शक्यता आहे.
Krishna’ Sugar Factory Election
Krishna’ Sugar Factory ElectionSarkarnama
Published on
Updated on

Satara, 17 April (अमोल जाधव) : कराड तालुक्यातील रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रबिंदू मानली जाते. यंदाची निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. (कै.) जयवंतराव भोसले आणि (कै.) आबासाहेब मोहिते गटाकडून जोरदार तयारी सुरू असताना यशवंतराव मोहिते गट मात्र शांत असल्याचे चित्र आहे. या गटाचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते यांनी अद्याप भूमिका जाहीर न केल्याने ते रिंगणात उतरणार की तटस्थ राहणार? याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता आहे.

कृष्णा कारखान्याच्या निवडणुका १९८९ पासून सातत्याने चर्चेत राहिल्या आहेत. त्या वर्षी माजी मंत्री (कै.) यशवंतराव मोहिते यांनी जयवंतराव भोसले यांच्या दीर्घकाळच्या वर्चस्वाला आव्हान देत ऐतिहासिक सत्तांतर घडवले होते. त्यानंतर मदनराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील काळ हा सभासदांसाठी सुवर्णकाळ मानला जातो. मात्र, १९९९ मध्ये कामगार असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भोसले गटाने पुन्हा सत्ता काबीज केली.

कारखान्याची राजकीय समीकरणे २००५ मध्ये बदलली आणि माजी मंत्री (कै.) पतंगराव कदम यांच्या डावपेचांमुळे भोसले यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर मदनराव मोहिते यांचे पुनरागमन झाले आणि डॉ. इंद्रजित मोहिते अध्यक्ष झाले.

मोहिते आणि भोसले कुटुंबात २००७ मध्ये मनोमीलन झाले. मात्र, ते फार काळ टिकले नाही. त्यातूनच (कै.) आबासाहेब मोहिते गटाचा उदय झाला. पुढे २०१० मध्ये पुन्हा ऐतिहासिक सत्तांतर घडले आणि पुढील निवडणुका तिरंगी स्वरूपात होत गेल्या. कारखान्याच्या २०१५ आणि २०२१ च्या निवडणुकांमध्ये भोसले गटाने बाजी मारत डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष झाले.

यंदाच्या निवडणुकीत भोसले आणि आबासाहेब मोहिते गट सक्रिय असताना यशवंतराव मोहिते गटातील शांतता चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे तिरंगी लढत होणार की नवे राजकीय समीकरण तयार होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Krishna’ Sugar Factory Election
Women Reservation : ‘महिला आरक्षणाच्या आडून मोदी सरकारचं मोठं षडयंत्र; ही बेईमानी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही’

मोहिते गट निर्णायक?

गेल्या निवडणुकीत यशवंतराव मोहिते रयत पॅनेलने तिरंगी लढतीत लक्षणीय मते मिळवली होती. त्यामुळे यंदाही या गटाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सध्या मदनराव मोहिते हे भोसले गटासोबत असल्याचे बोलले जात असताना डॉ. इंद्रजित मोहिते तटस्थ असल्याचे दिसून येत आहे.

आमदार विश्वजित कदम गटाचेही लक्ष

मोहिते गटाचे नेते डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या भूमिकेकडे कडेगाव-पलूस मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांच्यासह कार्यकर्त्यांचेही लक्ष आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच पुढील भूमिका ठरणार असल्याचे संकेत आहेत.

Krishna’ Sugar Factory Election
20 Maharaj : पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 महाराजांची यादी जाहीर; वारकरी संप्रदायातील प्रतिगामी घुसखोरीचा आरोप

राजकीय गट कसे तयार होतात, ते पाहूनच भूमिका ठरवू : डॉ. इंद्रजित मोहिते

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. निवडणुकीत राजकीय गट कसे तयार होतात, हे पाहूनच पुढील भूमिका ठरवू, असे कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com