Kolhapur Water Distribution : इचलकरंजी काय पाकिस्तानात आहे का ? धैर्यशील माने संतापले

Dhairyasheel Mane Furious On Ichalkaranji Water Distribution: इचलकरंजी आणि कागलमध्ये सध्या पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे.
Kolhapur Water Distribution :
Kolhapur Water Distribution :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : इचलकरंजी आणि कागलमध्ये सध्या पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. दुधगंगा नदीचे पाणी इचलकरंजीला देण्यास कागलकरांनी थेट नकार दिल्याने, इचलकरंजी काय पाकिस्तानात आहे का, असा सवाल उपस्थित करत खासदार धैर्यशील मानेंनी निशाणा साधला आहे.

खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हळवणकर आणि इचंलकरंजीच्या इतर नेते मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन करून पाणी देता मग इचलकरंजी काय पाकिस्तानमध्ये आहे का ? असा प्रश्न खासदार धैर्यशील मानेंनी उपस्थित केला आहे.

Kolhapur Water Distribution :
Ashwini Bhide IAS : 'मेट्रो वुमन' अशी ओळख असणाऱ्या IAS अधिकारी अश्विनी भिडे

दूधगंगा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला द्यायचे नाही या भूमिकेवर कागल तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत तर पाणी योजना झालीच पाहिजे या मागणीसाठी इचलकरंजी शहरातील सर्व नेते एकत्र आले आहेत.

धैर्यशील माने म्हणाले, दुसऱ्याला पाणी देणे ही आपली संस्कृती आहे. नदी, समुद्र, पाणी यावर कुणाचाही हक्क नसतो. आपण कर्नाटकाला 4 टीएमसी पाणी देतो तर आम्ही तुमच्याच हाडामासांचे आहोत. सुलकूट गावाच्या पुढे बंधारा बांधून पाणी अडवले जाणार आहे. त्यामुळे कागल तालुक्यातील गावाच्या हक्काचं पाणी इचलकरंजीला येणार नाही. त्यामुळे कागलकरांनी आपला गैरसमज दूर करावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

Kolhapur Water Distribution :
Kolhapur Water Distribution : अपुऱ्या माहितीमुळे कागलकरांचा विरोध; इचलकरंजीकर म्हणाले, हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे

खासदार मानेंनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आवाहन केले. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. संवेदनशील आहात, त्याच दृष्टीने या प्रश्नाकडे बघावे. त्यामुळे विरोध करण्यापेक्षा मदत करावी, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच, आपण या प्रश्नासाठी पाठपुरावा करणार आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनाही या गोष्टी समजावून सांगू आणि कसल्याही परिस्थितीत हा प्रश्न सोडवू, अशी ग्वाही दिली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com