NCP Politics : शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांचा पुढाकार; अजितदादा, जयंत पाटील अन् रोहित पवार एकत्र येणार?

Islampur politics : महायुतीकडून मागील काही दिवसांपासून जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय ते महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. त्यामुळे उद्या हे सर्व नेते एकत्र आल्यास एकमेकांविषय नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आयोजकांसह महायुती आणि जयंत पाटलांच्या समर्थकांना लागली आहे.
Jayant Patil, Ajit Pawar and Rohit Pawar
Ajit Pawar, Jayant Patil, and Rohit Pawar may come together on one stage in Islampur during Mahatma Phule Education Society’s inauguration, sparking political curiosity.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 15 Aug : जेष्ठ नेते शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमा निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे.

इस्लामपूर हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो. याच शहरात शनिवारी (ता.16) महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा व प्रारंभोत्सव कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, आता यापैकी नेमके कोण कोण नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, उद्या अजित पवारांचा सांगली जिल्ह्यात अधिकृत दौरा असल्यायामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे निश्चित आहे.

Jayant Patil, Ajit Pawar and Rohit Pawar
NCP Politics : सुरज चव्हाणांना नियुक्तीचं पत्र तटकरेंनी दिलं, पण 'तो' निर्णय अजित पवारांना न विचारता? दादांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील देखील या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून आणि अजित पवार महायुतीत सामील झाल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांपासून लांब राहणं पसंद करतात.

मात्र, आता उद्या त्यांच्याच बालेकिल्ल्यात आणि तेही शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी दिलेलं निमंत्रण जयंत पाटील टाळणार नाहीत. शिवाय या कार्यक्रमाला जर आमदार रोहित पवार उपस्थित राहिले तर एकाच व्यासपीठावर कट्टर विरोधक आल्याचं पाहायला मिळेल.

Jayant Patil, Ajit Pawar and Rohit Pawar
Shivsena UBT Politics: महायुतीचे अनेक मंत्री वादग्रस्त, मात्र शिंदे गटाचे मंत्रीच वादात का सापडतात?

त्यामुळे सर्व नेते व्यासपीठावर एकत्रित आल्यावर चांगली जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीकडून मागील काही दिवसांपासून जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय ते महायुतीत जाणार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. त्यामुळे उद्या हे सर्व नेते एकत्र आल्यास एकमेकांविषय नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आयोजकांसह महायुती आणि जयंत पाटलांच्या समर्थकांना लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com