Raju Shetti and Uddhav Thackeray
Raju Shetti and Uddhav Thackeray Sarkarnama

Raju Shetti: महाविकास आघाडीत जाणार का ? ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टींचं मोठं विधान

Raju Shetti Meet Uddhav Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली ?
Published on

जुई जाधव :

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून पक्ष-संघटना आणखी मजबूत करण्यासाठी राजकीय नेतेमंडळी कामाला लागली आहेत. सध्या आघाडी-महायुतीच्या नेत्यांचा बैठकांचा धडाका सुरू आहे. दोन्हीकडेही लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू आहेत.

यातच वंचित बहुजन आघाडीलाही महाविकास आघाडीत घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. असे असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Shetti and Uddhav Thackeray
Kolhapur Politics: सतेज पाटलांनी फोडला नवा राजकीय बॉम्ब; कोल्हापूर लोकसभेसाठी 'सरप्राईज' चेहरा ?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उभे राहणार असल्याची माहिती आहे.

राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं, असा आग्रह उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा असल्याचं बोललं जात आहे. मात्र, महाविकास आघाडीत राजू शेट्टी यांना हातकणंगलेमधून उमेदवारी देण्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Raju Shetti and Uddhav Thackeray
Gopichand Padalkar : पडळकरांना ओबीसी समाजाची चिंता; भीतीपोटीच राज्यभरामध्ये मेळावे...

दरम्यान, सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातील खासदार धैर्यशील माने विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आघाडीत समावेशासंदर्भात आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत ही महत्त्वाची बैठक असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्यासंदर्भात काय निर्णय होतोय ? शेट्टींना महाविकास आघाडीत एन्ट्री मिळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं आहे, तर या भेटीनंतर राजू शेट्टींनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चांवर मोठं भाष्य केलं आहे.

भेटीनंतर राजू शेट्टी काय म्हणाले ?

"उद्धव ठाकरे आणि माझी भेट राजकीय नव्हती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली. मी 15 जानेवारीपासून मराठवाडा दौरा सुरू करणार आहे. शेतकऱ्यांच्या या लढ्याला शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळावा, यासाठी ही भेट घेतली. तसेच एका उद्योगपतीविरोधात आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी ही भेट झाली. अदानींविरोधातील लढाई शेतकऱ्यांचीही आहे," असं शेट्टी म्हणाले.

'स्वाभिमानी' महाविकास आघाडीत जाणार का ?

"महाविकास आघाडीत जाण्याचा आमचा विचार नाही. 'स्वाभिमानी' स्वतंत्रपणे लढेल. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील, त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेने जाऊ. पण आज आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहोत, त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे, त्यासाठी उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली," असं राजू शेट्टींनी सांगितलं.

(Edited By Ganesh Thombare)

Raju Shetti and Uddhav Thackeray
Mahavikas Aghadi : 'वंचित'ला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काय ठरलं ? नाना पटोलेंचं मोठं भाष्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com