Pune Politics : पालिका निवडणुकीची तयारी? पुण्याच्या नव्या-जुन्या पालकमंत्र्यांनी एका टेबलावर बसून ठरवला 'मास्टर प्लॅन'

Ajit Pawar And Chandrakant Patil News : महायुती सरकारनंं लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे.त्याची तयारीही महायुतीतील मित्रपक्षांनी सुरु केली आहे.
Ajit Pawar Chandrakant Patil  .jpg
Ajit Pawar Chandrakant Patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून स्थानिक कामे मार्गी लावण्यासाठी नेतेमंडळी झटत असताना पाहायला मिळत आहेत. अशातच कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता.5) मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन मिसिंग लिंकचे काम मार्गी लावण्यासाठी मास्टर प्लॅन ठरवला आहे.

या चर्चेदरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावर अजित पवार यांनी पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी 15 प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी 'मिशन 15' हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 870 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 325 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी 150 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे.

Ajit Pawar Chandrakant Patil  .jpg
Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्येनंतर तापलेल्या बीडमध्ये जाऊन CM फडणवीसांनी दिली 'ही' ग्वाही; धसांचाही केला खास उल्लेख

पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.

याकरिता राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती देऊन पुणेकरांच्या सोयीसाठी हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे मंत्री चंद्रकांतद पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com