Vinay Kore : 'जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते, त्या बाजूला...' ; विनय कोरेंचं जाहीर विधान!

Jansuraj Shakti Party News : पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा पार पडला.
Vinay Kore
Vinay KoreSarakarnama

Loksabha Election 2024 : 'ज्योतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूला आहे, त्याच्यावर परमेश्वरच्या कृपेने विजयाचा गुलाल पडणार आहे.' असा विश्वास जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातून 85 टक्के मतदान धैर्यशीलदादा तुम्हाला मिळवून देऊ असं अभिवचनही त्यांनी दिले.

'जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते, त्या बाजूला गुलाल पडतो' या इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी ग्वाही विनय कोरे यांनी दिली. त्याचबरोबर राष्ट्रधर्म व राष्ट्रनिर्मिती जपण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन विनय कोरे यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinay Kore
Sangli Congress News : प्रदेश काँग्रेसची टीम गुरुवारी सांगलीत, पण विशाल म्हणतात; कारवाईचा प्रश्नच नाही

मंगळवारी पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार महामेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला. या ठिकाणी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थितती दाखवली. त्यावेळी ते बोलत होते.

तर शाहू महाराजांचे वय झालेले असताना त्यांना लोकसभेला उभं केलं आहे, मग त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही? असा सवाल करत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विकासगंगा अशीच वाहत राहण्यासाठी दोन्ही उमेदवार ना निवडून द्या, असं आवाहन केलं. सावकारांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार विजयी होणार हे खरं आहे, कारण मला राज्यसभेवर पाठवायच श्रेय त्यांचच आहे. असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केल.

Vinay Kore
Satej Patil Vs Sanjay Mandlik : सतेज पाटील गटाला धक्का; दक्षिणमध्ये लोकनियुक्त सरपंचांचा भाजपात प्रवेश

यावेळी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक, शेतकरी संघांचे संचालक प्रधान पाटील सर, संताजी बाबा घोरपडे, मा. जि प सदस्य शिवाजीराव मोरे, बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई, दगडू पाटील, प्रकाश पाटील आण्णा व विविध गावाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थाचे पदाधिकारी, जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते हजारो च्या संख्येने उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com