Jarange-Patil News : जरांगे-पाटील शब्दाचेही पक्के : मायणीकरांना दिलेला शब्द पाळला...

Manoj Jarange Patil मनोज जरांगे-पाटील मायणीत येत असून, मायणी-चितळी रोडवरील त्यांच्या सभेसाठी सुमारे ४५ एकर जागेची सोय करण्यात आली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

-अंकुश चव्हाण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील यांची मायणीतील मराठा बांधवांनी तीन वेळा भेट घेऊन त्यांची सभा मायणीत व्हावी, अशी आग्रही मागणी केली. मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे सभांचा कालावधी लांबला. मात्र, पाटलांनी तिसऱ्या दौऱ्यात सातारा जिल्ह्यातील मायणीकरांच्या मागणीला प्राधान्य देत सभेसह मुक्कामही करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जरांगे पाटील हे शब्दाचे पक्के असल्याची भावना मायणीतील मराठा बांधवांनी बोलून दाखवली.

संभाजीनगर येथे झालेल्या जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्यासाोबतच्या बैठकीत त्यांनी मायणीस येण्याचा शब्द दिल्यामुळे मराठा बांधवांचा Maratha Reservation आनंद व्दिगुणित झाला आहे. आजवर मराठा आरक्षणाच्या लढाईत मायणी व परिसरातील मराठा समाजाव्यतिरिक्त इतर सर्व समाजबांधवांनी पाठिंबा दिला आहे.

मायणी येथील मराठा समाजाचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख म्हणाले, मराठा आरक्षणासाठी जगजागृती करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांची तिसऱ्या टप्यात मायणीत येत आहेत. त्यासाठी मायणी-चितळी रोडवरील सभेसाठी सुमारे ४५ एकर व ७० एकर क्षेत्रावर पार्किंगसाठी जागेची सोय करण्यात आली आहे.

या सभेस सुमारे दीड लाख बांधवांची उपस्थिती गृहित धरून सातारा, सांगली, सोलापूर, मुंबई, पुणे भागातून मराठा बांधव हजेरी लावणार आहेत. ही सभा सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असल्याने स्वतंत्र हॅलोजन टॉवर, पाणीव्यवस्था, अग्निशामक, रुग्णवाहिकेसह एक हजार स्वयंसेवकांचे पथक तयार केले आहे. Maharashtra Political News

Manoj Jarange Patil
Maratha Reservation : कुणबी नाेंदीत साताऱ्याने मराठवाड्यालाही मागे टाकले; सापडल्या तब्बल २० हजार नोंदी

संभाजीनगर येथे झालेल्या जरांगे पाटील यांच्यासाेबतच्या बैठकीनंतर त्यांनी मायणीस येण्याचा शब्द दिल्यामुळे मराठा बांधवांचा आनंद व्दिगुणित झाला आहे. आजवर मराठा आरक्षणाच्या लढाईत मायणी व परिसरातील मराठा समाजाव्यतिरिक्त इतर सर्व समाजबांधवांनी पाठिंबा दिला. त्याच पद्धतीने या सभेसही सहकार्य करून ही सभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही डॉ. देशमुख यांनी केले. या नियोजन बैठकीस प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

Manoj Jarange Patil
Satara Political News : राष्ट्रवादी कुणाची... महादेव जानकरांनी स्पष्टच सांगितले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com